Press "Enter" to skip to content

नवरीने खरंच लग्नमंडपात गुटखा खाणाऱ्या नवरदेवाच्या तोंडात मारली का?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये लग्नमंडपात लग्नविधी पार पाडत असलेले नवरदेव-नवरी दिसताहेत. तेवढयात व्हिडिओतील नवरी (bride) लग्नविधी थांबविण्यास सांगते. चिडलेली नवरी आधी गुटखा (gutkha) खाऊन लग्नमंडपात पोहोचलेल्या नवरदेवाच्या मित्राचा समाचार घेते. नंतर ती आपला मोर्चा नावरदेवाकडे (groom) वळवताना त्याच्या देखील तोंडात मारते. अनेकजन हा व्हिडीओ शेअर करताना नवरीने नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला असल्याचा दावा करताहेत.

Advertisement

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओच्या आधारे टीव्ही ९ मराठी, आपलं महानगर आणि लोकमतने बातम्या दिल्या आहेत. हिंदी आणि इंग्रजीतील अनेक माध्यमांनी देखील नवरदेवाला धडा शिकवणाऱ्या नवरीचे कौतुक करणाऱ्या बातम्या चालवल्या आहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सर्वप्रथम ४ एप्रिल २०२० रोजी चंदन मिश्रा या व्हेरीफाईड युट्यूब चॅनेलवरून “रामलाल ने अपनी शादी में जो किया वो आप भूल के भी मत करना !” अशा शीर्षकासह अपलोड करण्यात आला होता.

मूळ व्हिडीओ साधारणतः ११ मिनिटांचा आहे. बिहारच्या मैथिली भाषेतील हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनासाठी बनवण्यात आलेला आहे. कारण चंदन मिश्रा या युट्यूब चॅनेलवर इतर अनेक कॉमेडी व्हिडीओ उपलब्ध आहेत. या सर्व व्हिडिओमधील मुख्य व्यक्तिरेखा रामलाल नावाची व्यक्तीच आहे. सध्याच्या व्हायरल व्हिडिओत रामलाल नवरदेवाच्या भूमिकेत आहे.

Source: Youtube

फेसबुकवर रामलाल मैथिली नावाचे फेसबुक पेज देखील आहे. या पेजवर देखील रामलालच्या कॉमेडीचे विविध व्हिडीओज बघायला मिळतात. फेसबुक पेजवर देखील पेजवरील व्हिडीओ लोकांच्या प्रबोधनासाठी बनविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी नाही. नवरीने (bride) लग्नमंडपात गुटखा (gutkha) खाणाऱ्या नवरदेवाच्या (groom) तोंडात मारल्याचा व्हिडीओ हा कॉमेडी व्हिडीओ आहे. खऱ्याखुऱ्या लग्नात घडलेली घटना कॅमेऱ्यात कैद झालेली नसून अगदी ठरवून हा कॉमेडी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

हेही वाचा- काश्मीरमध्ये खातमा केलेल्या अतिरेक्याचा म्हणून माध्यमांनी वापरला ISIS दहशतवाद्याचा फोटो!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा