Press "Enter" to skip to content

शिर्डी साई संस्थानाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी देण्यास नकार दिलाय का?

सोशल मीडियावर दावा केला जातोय की शिर्डी साई संस्थानाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी (shirdi sai sansthan ram mandir donation) देण्यास नकार दिला आहे. देणगी देण्यास नकार देताना संस्थानाने हिंदू संस्थान नसल्याचे कारण दिले आहे.

Advertisement

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या अकाऊंटवरून करण्यात आलेलं अशा प्रकारचा दावा करणारं ट्विट जवळपास ९०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह ट्विट

फेसबुकवर देखील याच ट्विटचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पडताळणी:

आम्ही सर्वप्रथम गुगल किवर्डसच्या साहाय्याने शिर्डी साई संस्थानाकडून अशा प्रकारचे कुठले स्टेटमेंट दिले आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र या दाव्याची खातरजमा करणारी एकही बातमी आम्हाला मिळू शकली नाही. आम्ही संस्थानाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथे काही माहिती मिळतेय का हे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथेही आमच्या हाती काहीच लागलं नाही.

पडताळणी दरम्यान आमच्या असे लक्षात आले की यापूर्वी याचवर्षीच्या जून महिन्यात देखील अशाच प्रकारचे दावे व्हायरल झाले होते. त्यावेळी ‘द लल्लनटॉप’ने या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी शिर्डी साई संस्थानाशी संपर्क साधला होता. त्यावेळी संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण किशोर डोंगरे यांनी हा दावा फेक असल्याचे स्पष्ट केले होते.

अरुण किशोर डोंगरे यांनी लल्लनटॉपशी बोलताना सांगितले होते की, सर्व धर्माचे लोक मोठ्या आस्थेने शिर्डी साई बाबांच्या मंदिरात येतात. येथील सर्व व्यवस्था बघण्याचे काम एका ट्रस्टमार्फत केले जाते. रुपये ५० लाख किंवा त्यापेक्षा अधिकचा खर्च किंवा देणगीच्या मंजुरीसाठी हायकोर्टाच्या परवानगीची आवश्यकता असते.

कुठल्याही प्रकारच्या देणगी अथवा खर्चासाठी आधी तश्या प्रकारचा प्रस्ताव समितीसमोर मांडला जातो. मात्र राम मंदिराच्या देणगीसंदर्भात (shirdi sai sansthan ram mandir donation) कुठलाही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही. साहजिकच त्यावर कुठलाही निर्णय होण्याची काही शक्यताच नाही. दुसऱ्या धर्माच्या दाव्याला देखील काहीही अर्थ नाही.

यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये देखील असेच दावे व्हायरल झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगलिकर यांनी हे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की शिर्डी साई संस्थानाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी देण्यास नकार दिल्याच्या दाव्यांना काहीही अर्थ नाही. संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सोशल मीडियातील व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट केलेले आहे.

हे ही वाचा- अयोद्धेत ५००० वर्षे जुनं ‘राम मंदिर’ सापडलंय का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा