Press "Enter" to skip to content

रशियन सरकारने मुस्लिमांना “गैर मुस्लिम” व्यक्तीशी लग्न करण्यास बंदी घातली आहे?

देशभरातील अनेक भाजपशासित राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा कायदा आणण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या कायद्यांच्या बाजूने जनमताच्या निर्मितीसाठी अनेक दावे-प्रतिदावे केले जाताहेत. एक दावा असाही करण्यात येतोय की रशियन सरकारने मुस्लिमांच्या “गैर मुस्लिम” व्यक्तीशी लग्न करण्यावर बंदी (russia bans muslim non-muslim marriages) घातली आहे.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

रशियन सरकारने खरंच मुस्लिम लोकांनी गैर मुस्लिमांशी लग्न करण्यावर बंदी घातली आहे का (russia bans muslim non-muslim marriages) हे पडताळण्यासाठी आम्ही गुगल सर्चची मदत घेतली. रशियन सरकारने अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेतला असल्याची कुठलीही बातमी आम्हाला सापडली नाही. रशियन सरकारच्या कुठल्याही अधिकृत सूत्रांकडून या दाव्याची खात्री पटू शकली नाही.

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘रेडियो फ्री युरोप, रेडिओ लिबर्टी’ नामक वेबसाईटवर प्रकाशित रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार ‘रुसी मुस्लिम स्पिरिचुअल डायरेक्टरेट’ या रशियामधील मुस्लिम शिक्षणतज्ज्ञांच्या संस्थेने एका फतव्याच्या माध्यमातून मुस्लिम व्यक्तींनी गैर मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यावर बंदी घातली होती. या फतव्याबाबत निर्णय गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्येच घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी 10 नोव्हेंबर 2020 रोजीपासून सुरु करण्यात आली आहे.

‘द मॉस्को टाईम्स’च्या १२ नोव्हेंबर २०२० रोजीच्या रिपोर्टनुसार ‘स्पिरिचुअल एडमिनिस्ट्रेशन ऑफ़ मुस्लिम्स ऑफ़ रशिया’च्या सल्लागार परिषदेने म्हंटले आहे की काही निवडक प्रकरणांमध्ये स्थानिक मौलवींच्या परवानगीनंतरच मुस्लिम मुलगा आणि गैर मुस्लिम मुलगी यांच्यातील आंतर-धार्मिक लग्नांना मंजुरी दिली जाईल.

मुस्लिम समुदायातूनच या फतव्याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर मात्र परिषदेचे उपाध्यक्ष दमिर मुखेतडिनोव यांनी संदर्भात स्पष्टीकरण दिली होते. आपल्या स्पष्टीकरणात ते म्हणतात की रशिया हा एक धर्मनिरपेक्ष देश असून परिषदेच्या निर्णयाचा रशियन सरकारशी कसलाही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की रशियन सरकारने मुस्लिमांच्या गैर मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यावर बंदी घातलेली नाही. रशियातील एका खासगी संस्थेने यासंदर्भात फतवा काढलेला आहे.

मुस्लिम शिक्षणतज्ञांच्या खासगी संस्थेच्या फतव्याशी रशियन सरकारचा काहीएक संबंध नाही. सहाजिकच या फतव्याला कायदेशीर संरक्षण नाही. त्यामुळे रशियन सरकारने मुस्लिम-गैर मुस्लिम लग्नांवर बंदी आणली असल्याचे दावे देखील दिशाभूल करणारे आहेत.

हे ही वाचा- मुस्लीम युवक हिंदू वेद-उपनिषदांमध्ये चुकीचे बदल करून प्रकाशित करताहेत?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Comments are closed.

× न्यूज अपडेट्स मिळवा