Press "Enter" to skip to content

रोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार ?

सोशल मीडियावर ‘झी न्यूज’च्या DNA या कार्यक्रमातील एक छोटीशी व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय. दावा केला जातोय की पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामधील एका गावात रोहिंग्या मुस्लिमांकडून (Rohingya Muslims) हिंदू कुटुंबातील ४५ जणांची हत्या करण्यात आली.

Advertisement

“कलकत्ता के एक छोटे गांव से  एक हजार हिन्दू आदमी छोटे बच्चे तथा बड़े मिला कर  गायब हो गए हैं  45 शव बरामद किए हैं  रोहिंग्या मुसलमानों ने हिंदूओं का कत्ल कर दिया जी न्यूज की खबर सुने” अशा दाव्यासह ही व्हिडीओ क्लिप शेअर केली जातेय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओसोबत “कहीं पानी मिले तो डूब जाइए. यह उन हिंदुओं के लिए एक तमाचा है जो भाईचारे का नारा लगाते रहते हैं.” असं हिंदीतील कॅप्शन देखील बघायला मिळतंय.

कलकत्ता के एक छोटे गांव से एक हजार हिन्दू आदमी छोटे बच्चे तथा बड़े मिला कर गायब हो गए हैं45 शव बरामद किए हैं, रोहिंग्या मुसलमानों ने हिंदूओं का कत्ल कर दिया। #HinduMassMurder(कुछ समय पुराना)

Posted by Ashish Mehta on Tuesday, 13 July 2021

पडताळणी:

व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता लक्षात येते की व्हिडिओमध्ये अँकर सुधीर चौधरी एका ठिकाणी ‘रखाईन’ प्रांताचा उल्लेख करताहेत. ‘रखाईन’ का ये इलाका मुम्बडा जिले में हैं’ असं ते म्हणताहेत.

म्हणजेच ही घटना ‘रखाईन’ प्रांतातील आहे. ‘रखाईन प्रांत’ पश्चिम बंगालमध्ये नाही, तर म्यानमारमध्ये आहे.

घटनेच्या तपशीलवार माहितीसाठी आम्ही किवर्डच्या आधारे ‘झी न्यूज’च्या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. ‘झी न्यूज’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला DNA कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळाला.

‘म्यानमारमधील हिंदूंच्या नरसंहारावरील DNA विश्लेषण’ अशा हेडलाईनसह अपलोड करण्यात आलेल्या या एपिसोडमध्ये ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’कडून केल्या गेलेल्या नरसंहाराची माहिती देण्यात आली आहे.

व्हिडीओ २०१७ मधील म्हणजेच साधारणतः ४ वर्षांपूर्वीचा आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’कडून ९९ हिंदूंचा नरसंहार करण्यात आल्याचा दावा अम्नेस्टी इंटरनॅशनलने केला असल्याचे, बीबीसीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. दरम्यान, संघटनेकडून मात्र या हल्ल्याची जबाबदारी नाकारण्यात आली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘झी न्यूज’च्या बातमीपत्रातील म्यानमारमधील राखाईन प्रांतातील घटनेचा व्हिडीओ कोलकात्याचा म्हणून व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओ साधारणतः ४ वर्षांपूर्वीचा असून व्हिडिओचा कोलकाता अगर भारताशी संबंध नाही.

हेही वाचा- न्याय मागायला गेलेल्या हिंदू मुलीला पाकिस्तानमध्ये वकिलांनीच लाथा बुक्क्यांनी मारले? वाचा सत्य!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा