Press "Enter" to skip to content

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पढली मशिदीत नमाज? हा कॉंग्रेसचा खरा चेहरा? वाचा सत्य!

सोशल मीडियावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचा एक व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये अशोक गहलोत मशिदीच्या बाहेर पडताना दिसताहेत. दावा करण्यात येतोय की अशोक गहलोत हे नमाज (Namaz) पढून मशिदीच्या बाहेर पडताहेत.

Advertisement

जुम्मे की नमाज अदा करने के बाद मस्जिद से बाहर निकलते हुए मुख्यमंत्री अशोक गहलोत 😡😡😡

Posted by विनोद कुमार सिंह रैकवार on Saturday, 5 June 2021

अर्काइव्ह

ट्विटरवर देखील हा व्हिडीओ अशाच दाव्यांसह शेअर केला जातोय. या व्हिडिओच्या आधारे काँग्रेस ‘हिंदू-विरोधी’ पार्टी असल्याचा यापेक्षा दुसरा काय पुरावा हवा, असं विचारलं जातंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नक्की कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ‘आज तक’च्या वेबसाईटवर २३ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध व्हिडीओ रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडीओविषयी माहिती मिळाली.

‘आज तक’च्या रिपोर्टनुसार व्हिडीओ अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या डुंगरपूर दौऱ्या दरम्यानचा आहे. अशोक गहलोत यांनी जानेवारी २०१९ मध्ये डुंगरपूर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील फख़रुद्दीन बाबा दर्ग्याला भेट दिली होती. यात कुठेही अशोक गहलोत यांनी नमाज (Namaz) पढल्याचं सांगण्यात आलेलं नाही.

काँग्रेस आमदार राजेंद्र सिंह यादव यांनी देखील या दौऱ्याचे फोटो आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून शेअर केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये देखील फोटो डुंगरपूरमधील गलियाकोट दर्ग्याच्या भेटीचे असल्याचे म्हंटले आहे.

माननीय मुख्यमंत्री श्री अशोक गहलोत जी के साथ डूंगरपुर की गलियाकोट दरगाह में जियारत कर देश व प्रदेश की खुशहाली की कामना की।

Posted by Rajendra Singh Yadav on Monday, 28 January 2019

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आम्हाला ‘न्यूज ५३’ या युट्यूब चॅनेलवर देखील बघायला मिळाला. या चॅनेलवर हा व्हिडीओ २८ जानेवारी २०१९ रोजी अपलोड करण्यात आला आहे. म्हणजेच व्हिडीओ सध्याचा नसून साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास दोन वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय व्हिडिओसोबत केलेले जात असलेले अशोक गेहलोतांनी नमाज पढल्याचे दावे देखील चुकीचे आहेत.

हे ही वाचा- मुख्यमंत्री अशोक गेहलोत सोनिया गांधींना नमन करत उभे राहिले होते का ?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा