Press "Enter" to skip to content

राज्यात फटाकेबंदी लागू असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वत:च उडवले फटाके?

वायु प्रदूषणात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या दिवाळीमध्ये अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांवर बंदी घातलेल्या राज्यांमध्ये राजस्थानचा (firecrackers ban in rajasthan) देखील समावेश आहे. राजस्थानमध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्यांना १० हजार रूपये दंड आणि फटाके उडवणाऱ्यांवर २ हजार रूपये दंड ठोठावण्याचा निर्णय

Advertisement
घेण्यात आला आहे.

राज्यातील फटाके बंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोमध्ये अशोक गहलोत आपल्या कुटूंबासह फटाके उडवताना दिसताहेत. दावा केला जातोय की मुख्यमंत्री म्हणून राजस्थानमध्ये फटाक्यांवर बंदी घालणाऱ्या गेहलोत यांनी स्वत: मात्र परिवारासह फटाके उडवून दिवाळी साजरी केली.

आपल्याच सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणारे मुख्यमंत्री अशोक गहलोत प्रदूषण न करणारे फटाके उडवत असल्याचा टोमणा देखील मारला जातोय. फटाकेबंदीच्या निर्णयाबाबतीत अशोक गेहलोत दांभिक असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. 

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे चिरंजीव वैभव गहलोत यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हा फोटो मिळाला.

वैभव गहलोत यांनी वेगवेगळ्या ४ फोटोंचा सेट शेअर केलाय. त्यामध्येच सध्या व्हायरल होत असलेला फोटो देखील आहे. दिवाळीनिमित्त सहपरिवार लक्ष्मीपूजन केल्याचं वैभव गहलोत यांनी ट्विटच्या कॅप्शनमध्ये सांगितलंय.

वैभव गहलोत यांच्या अकाऊंटवरून दि. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी हे ट्विट करण्यात आलं होतं. म्हणजेच सध्या व्हायरल होत असलेला फोटो या दिवाळीतील नसून गतवर्षीच्या दिवाळीतील आहे.

स्वतः अशोक गहलोत यांनी देखील गेल्या वर्षी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो अपलोड केला होता. त्यावेळी राजस्थानमध्ये फटाक्यांवर कुठलीही बंदी (firecrackers ban in rajasthan) नव्हती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या संदर्भात केला जाणारा दावा फेक आहे. अशोक गहलोत यांनी फटाकेबंदीच्या निर्णयाची पायमल्ली केलेली नाही.

अशोक गेहलोत यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फटाके उडवतानाचा फोटो या वर्षीच्या दिवाळीतील नसून गेल्या वर्षीच्या दिवाळीतील आहे. या फोटोचा राजस्थानातील फटाकेबंदीच्या निर्णयाशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींना उभे राहून नमन केले आहे?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा