Press "Enter" to skip to content

राहुल गांधींनी गुरुद्वाऱ्यात लंगरचा प्रसाद घेतल्याचं नाटक करत फोटोसेशन केलं, पण मास्क काढायचं विसरले?

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गेले. तेथे त्यांनी लंगरचा प्रसादही घेतला. अनेक माध्यमांनी या संदर्भातील बातम्या दिल्या.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या संदर्भातील ANI या वृत्तसंस्थेच्या बातमीचा व्हिडीओ रिट्विट केलाय. त्यात ते मास्क घालून लंगरचा प्रसाद घेणाऱ्या राहुल गांधींची खिल्ली उडवताहेत. हे आठवे आश्चर्य असल्याचे सांगत राहुल गांधी लंगर जेवल्याचे नाटक करत असल्याचे सुचविण्याचा प्रयत्न करताहेत.

Advertisement

अर्काइव्ह

हरियाणा भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण यादव यांनी देखील राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केलाय. फोटोत राहुल गांधी सामान्य महिलांसोबत जेवणाच्या पंक्तीत बसलेले दिसताहेत. या फोटोत देखील राहुल गांधींच्या चेहऱ्यावर मास्क आहे.

फोटो ट्विट करताना अरुण यादव म्हणताहेत की राहुल गांधी हे मास्क घालून जेवण करणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांचाही रोख हेच सांगण्याचा आहे की राहुल गांधी जनसामान्यांसोबत जेवत नाहीयेत, तर केवळ फोटोसेशन करण्यापुरतं जेवल्याचं नाटक करताहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी आम्ही किवर्डसच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला खुद्द राहुल गांधी यांच्याच ट्विटर हॅण्डलवरून 27 जानेवारी रोजी ट्विट करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडीओ बघितल्यावर लक्षात येते की ताटातील वाढ पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधींनी चेहऱ्यावरील मास्क काढून ठेवला आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली. व्हिडीओमध्ये राहुल गांधी जेवत असल्याचे स्पष्ट बघायला मिळतेय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. यात कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील एक ट्विट आम्हाला सापडले.

या ट्विटमध्ये त्यांनी व्हिडीओ शेअर केलेला आहे. या मध्ये आपण पाहू शकतो की राहुल गांधी आणि आसपासच्या महिलांचे जेवण झालेले आहे. ते त्या महिलांशी दुभाषकाच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

परंतु या व्हिडीओत देखील जेवनाची दृश्ये नसल्याने आम्ही अधिक शोधाशोध केली. तेव्हा तमिळनाडू कॉंग्रेस कमिटीच्या अधिकृत ट्विटरवरील फोटोज आम्हाला मिळाले. यामध्ये राहुल गांधी जेवताना दिसताहेत. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नाहीये.

यास अधिक सबळ पुराव्यांची पुष्टी मिळावी म्हणून आम्ही व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘पुथियाथलाईमुराई टीव्ही’ नामक लोकल न्यूजच्या युट्युब चॅनलवरील बातमी आम्हाला मिळाली. यात आपण पाहू शकतो की पानावर जेवण वाढेपर्यंत राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. जेव्हा सर्व पदार्थ वाढले गेले तेव्हा त्यांनी मास्क काढून डाव्या हातात पकडला आणि जेवण सुरु केले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले की भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि हरियाणा भाजपचे नेते अरुण यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चेहऱ्यावरील मास्कवरून खिल्ली उडवत केलेला दावा चुकीचा आहे. राहुल गांधींनी अमृतसर येथील गुरुद्वाऱ्यात लंगरचा प्रसाद देखील घेतला होता आणि तामिळनाडू दौऱ्यादरम्यान जनसामान्यांसोबत पंक्तीला बसून जेवण देखील केले होते.

हेही वाचा: आलू डालो सोना निकलेगा‘ म्हणणारा राहुल गांधीचा व्हायरल व्हिडीओ एडिटेड!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा