Press "Enter" to skip to content

पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पोलिसांसमक्ष खलिस्तान जिंदाबादच्या नारेबाजीचे दावे फेक!

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP) एकहाती सत्ता मिळाल्यानंतर खलिस्तान समर्थक सक्रीय झाले आहेत. त्यांची हिम्मत एवढी वाढली आहे की अगदी पोलिसांसमोर ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या नारेबाजीसह रॅली काढली जात असल्याचे दावे एका व्हिडीओसह व्हायरल होतायेत.

Advertisement

‘पंजाब मे केजरीवाल के सरकार बनते ही खालिस्तानीओ का खेल खालिस्तान की मांग शुरू हो गया वामपंथी कांग्रेस आमदमी पार्टी के समर्थक है ये देशद्रोही खालिस्तान समर्थक’ अशा कॅप्शनसह रॅलीचा व्हिडीओ शेअर केला जातोय.

हेच दावे फेसबुकवरही जोरदार व्हायरल होत आहेत.

Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण कलाल आणि राजेंद्र काळे यांनी सदर व्हिडिओ व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यात असणाऱ्या एका होर्डिंगवर ‘Justice for Deep Sidhu’ असे लिहिलेली एक पाटी दिसली.

हाच धागा पकडत गुगल सर्च केले असता व्हीके न्यूजची बातमी आम्हाला मिळाली. सदर बातमीनुसार पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या (Deep Sidhu) स्मरणार्थ आयोजित रॅलीमध्ये ही घोषणाबाजी झाली होती. शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) सहभागी झालेल्या या अभिनेत्याचे १५ फेब्रुवारी अपघाती निधन झाले. त्याच्याच स्मरणार्थ २१ फेब्रुवारी रोजी ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

सदर व्हिडीओचा ‘आप’च्या जिंकण्याशी काहीएक संबंध नाही

अभिनेता दीप सिद्धूचे अपघाती निधन १५ फेब्रुवारी रोजी झाले. रॅली २१ फेब्रुवारी रोजी काढली गेली. पंजाब निवडणुकांची मतमोजणी व निकाल १० मार्च रोजी लागले. याचाच अर्थ व्हायरल व्हिडीओ पंजाबमध्ये ‘आप’ सत्तेत येण्यापूर्वीचा आहे. दोन्ही घटनांचा एकमेकांशी काहीएक संबध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ खरा आहे. पंजाबमधील रॅलीमध्ये ‘खलिस्तान जिंदाबाद’चे नारेबाजी झाली होती. परंतु या व्हिडीओचा पंजाबमध्ये ‘आम आदमी पार्टी’ सत्तेवर येण्याशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ पंजाब विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीचा आहे.

हेही वाचा: ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून लालकृष्ण अडवाणींना रडू कोसळल्याचे दावे फेक! वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा