Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशमधील जनतेने ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना पळवून लावले?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोकांचा जमाव एका कारचा पाठलाग करून गाडीवर हल्ला करत असल्याचे बघायला मिळतेय. व्हिडिओसोबत दावा केला जातोय की राज्यातील विजेचे दर जास्त असल्याने जनतेने ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा (Shrikant Sharma) यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना पळवून लावले.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेजचा साहाय्याने शोधल्या असता ‘न्यूज रांची’ नावाच्या युट्युब चॅनेलवर 31 जानेवारी 2022 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. ‘माजी खासदार रवींद्र राय यांच्यावर हल्ला, आंदोलकांनी वाहनाची विंडशील्ड तोडली. नामफलक उखडला’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या युट्यूब चॅनेलवरील रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टमध्ये घटनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार व्हिडीओ झारखंडमधील आहे.

झारखंडमधील धनबाद आणि बोकारोमध्ये भोजपुरी आणि मगही या भाषांचा प्रादेशिक भाषांच्या यादीत समावेश करण्याच्या विरोधात भाषा हक्क कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. याच आंदोलनादरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोडरमाचे माजी खासदार रवींद्र राय (Dr. Ravindra Ray) आंदोलकांच्या निशाण्यावर आले.

आंदोलकांनी बोकारो येथील तेलमाचो पुलाजवळ रवींद्र राय यांच्या ताफ्यावर हल्ला केला. घटनेदरम्यान गाडीच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवल्याने गाडी लवकरच बाहेर काढली गेली. घटनेदरम्यान राय यांच्या अंगरक्षकांना दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

रवींद्र राय यांनी देखील आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून या हल्ल्याची माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवले नसते तर आपण कदाचित येथे ही पोस्ट करू शकलो नसतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Ravindra Kumar Ray FB post
Source: Facebook

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. झारखंडमध्ये भाषा आंदोलनादरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र राय यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांच्यावरील हल्ल्याचा म्हणून शेअर केला जातोय.

हेही वाचा-योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीआधी चक्क पैसे वाटले? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा