Press "Enter" to skip to content

पाकिस्तानला त्रासलेल्या हिंदूंना भेटण्यासाठी नरेंद्र मोदी थेट विस्थापितांच्या छावणीत पोहोचलेले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय फोटो साधारणतः ३१ वर्षांपूर्वीचा असून त्यावेळी देशाचे पंतप्रधान किंवा गुजरातचे मुख्यमंत्री देखील नसलेले नरेंद्र मोदी (Narendra Modi) पाकिस्तानमधून विस्थापित झालेल्या हिंदूंना भेटण्यासाठी थेट बाडमेरमधील विस्थापितांच्या छावणीत पोहोचले होते.

Advertisement

हिंदू युवा वाहिनीशी संबंधित योगी देवनाथ यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा फोटो शेअर केलाय. त्यात ते म्हणतात,

“ये 31 वर्ष पुरानी दुर्लभ तस्वीर है,जब नरेंद्र मोदी जी बाड़मेर में पाकिस्तान से विस्थापित हिंदुओं से मिलने उनके कैम्प में पहुँचे थे. तब मोदी जी ना गुजरात के मुख्यमंत्री थे और ना ही देश के प्रधान सेवक थे. दुख और मुशीबत मे लोगों के साथ खड़ा होना मोदी जी की फितरत में शामिल है।”

योगी देवनाथ यांचं हे ट्विट साधारणतः १८०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

 • सर्वप्रथम तर आम्ही नरेंद्र मोदींनी बाडमेर येथील हिंदू विस्थापितांच्या छावणीला भेट दिल्याच्या घटनेसंबंधीच्या बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अशा प्रकारची माहिती देणारी कुठलीही बातमी मिळाली नाही.
 • पडताळणीच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला ‘फायनान्सिअल एक्स्प्रेस’च्या वेबसाईटवर नरेंद्र मोदींवरील फोटो फिचरमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला.
 • फोटोच्या कॅप्शननुसार १९७३ मध्ये नरेंद्र मोदींनी नवनिर्माण आंदोलनामध्ये भाग घेतला होता. या आंदोलनामुळे गुजरातमधील काँग्रेसचे सरकार पडले होते. आंदोलना दरम्यान मोदींना भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्यातील नेते जयप्रकाश नारायण यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
 • नरेंद्र मोदींच्या अधिकृत वेबसाईटवर देखील आम्हाला व्हायरल फोटो बघायला मिळाला. त्यानुसार फोटो गुजरातमधील एका गावातील असल्याचे सांगण्यात आले आहे. फोटो नेमका कुठल्या गावातील आहे, याविषयी माहिती मात्र उपलब्ध नाही.
 • वेबसाईटवर माहितीनुसार १९७७ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदींवर दक्षिण आणि मध्य गुजरातचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे त्यांना राज्यातील जवळपास प्रत्येक तालुका आणि गावात जाण्याची संधी मिळाली.
 • व्हायरल फोटोच्या संदर्भाने तो बाडमेरमधील पाकिस्तानातून आलेल्या हिंदू विस्थापितांच्या छावणीमधील असल्याचे कुठेही सांगण्यात आलेले नाही. याविषयीच्या कुठल्याही बातम्या उपलब्ध नाहीत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हायरल फोटोसोबत केले जात असलेले दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटो गुजरातमधील एका खेडेगावातील आहे. शिवाय व्हायरल फोटोसोबतच्या दाव्यांप्रमाणे फोटोचा पाकिस्तानातून बाडमेरमध्ये विस्थापित हिंदूंशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे का?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा