सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील एक वक्तव्य व्हायरल होतेय. पंतप्रधानांनी आपल्या कार्यक्रमात भजनामुळे कुपोषण दूर केले जाऊ शकत असल्याचा दावा केल्याचे सांगितले जातेय. या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली जातेय.
‘द वायर’ने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.
‘द वायर’च्या याच बातमीचा स्क्रिनशॉट अनेकांकडून शेअर केला जातोय. त्याआधारे पंतप्रधान मोदींवर टीका होतेय, खिल्ली उडवली जातेय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं काय म्हणालेत हे बघण्यासाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमातील भाषणाचा मूळ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. युट्युबवर ‘नरेंद्र मोदी’ याच नावे असलेल्या व्हेरीफाईड अकाऊंटवरून 28 ऑगस्ट रोजी सदर कार्यक्रमाची ४.१२ सेकंदाची क्लिप अपलोड करण्यात आली आहे.
या क्लिपच्या १.०० मिनिटांपुढे त्यांचे हे वक्तव्य आपणास ऐकू येते. त्यांचे वक्तव्य जसेच्या तसे पुढीलप्रमाणे:
आप कल्पना कर सकते हैं, क्या कुपोषण दूर करने में गीत-सींगीत और भजन का भी इस्तेमाल हो सकता है? मध्य प्रदेश के दततया तिले में “मेरा बच्चा अभियान”! इस “मेरा बच्चा अभियान” में इसका सफलतापूवाक प्रयोग किया गया | इसके तहत, जिले में भजन-कीर्तन आयोजित हुए, जिसमें पोषण गुरु कहलाने वाले शिक्षको को बुलाया गया | एक मटका कार्यक्रम भी हुआ, इसमें महिलाये, आंगनबाडी केंद्र के लिये मुठ्ठीभर अनाज लेकर आती हैं और इसी अनाज से शनिवार को ‘बालभोज’ का आयोजन होता है | इससे आंगनबाडी केंद्रो मे बच्चो की उपस्थिती बढने के साथ ही कुपोषण भी कम हुआ है|
‘ऑल इंडिया रेडीओ’ने ‘मन की बात’ कार्यक्रमातील भाषण हिंदी-इंग्रजी दोन्ही भाषेत अपलोड केले आहे. यामध्येही वरील उतारा आपण वाचू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘द वायर’ची बातमी दिशाभूल करणारी आहे. ‘द वायर’ने पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यातील केवळ एक वाक्य घेऊन त्याचा विपर्यास करत बातमी प्रसारित केली. भजनाच्या अनुषंगाने होत असलेल्या भोजन कार्यक्रमामुळे कुपोषणावर मात करणे शक्य असल्याचे ते आपल्या भाषणातून सोदाहरण सांगताहेत.
हेही वाचा: योगी आदित्यनाथ यांनी शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन केले आहे?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment