Press "Enter" to skip to content

केरळमधील मुस्लिमांनी अतिप्राचीन हिंदू मंदिरावर अवैधरित्या कब्जा करून मशीद बांधली?

सोशल मीडियावर एका मशिदीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की केरळमधील मुस्लिमांनी एका अतिप्राचीन हिंदू मंदिरावर अवैध कब्जा मिळवला आणि त्या मंदिराला मशिदीचे रूप दिले. हिंदू समाजाच्या विरोधानंतरही केरळच्या ‘डाव्या-कम्युनिस्ट’ सरकारने कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप देखील केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पडताळणी:

व्हिडीओ काळजीपूर्वक बघितला असता व्हिडिओच्या डावीकडील वरच्या कोपऱ्यात एक वाटरमार्क बघायला मिळतोय. TSOI हा वाटरमार्क व्हिडिओच्या 15 व्या सेकंदाला ‘Thousand shades of India’ मध्ये बदलताना दिसतोय.

Logo on the video

व्हिडिओमधील वाटरमार्कच्या मदतीने शोध घेतला असता आम्हाला Thousand shades of India चे इंस्टाग्राम पेज आणि युट्यूब चॅनेल बघायला मिळाले. इंस्टाग्राम पेजवरील पोस्ट शोधल्या असता 20 डिसेंबर 2021 रोजीच्या पोस्टमध्ये आम्हाला व्हायरल व्हिडीओ बघायला मिळाला.

Viral video on Insta page
Source: Instagram

इंस्टाग्राम पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सदर व्हिडीओ कर्नाटकाच्या मंगळूरमधील झीनत बख्श मशिदीचा आहे. सोबतच ही कर्नाटकमधील सर्वात जुनी आणि भारतातील तिसरी सर्वात जुनी मशीद असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

गुगलवर झीनत बख्श मशिदीविषयी (Zeenath Baksh Masjid) अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला कर्नाटक पर्यटन विभागाचा एक ब्लॉग वाचायला मिळाला.

ब्लॉगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार झीनत बख्श मशीद मंगळूरच्या बुन्दर भागात आहे. इसवी सन 644 मध्ये अरब मुस्लिम व्यापार्‍यांनी ही मशीद बांधली असल्याचे मानले जाते. टिपू सुलतानने 17व्या शतकात मशिदीचे नूतनीकरण केले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केरळमधील मुस्लिमांनी अवैधरित्या अतिप्राचीन हिंदू मंदिर ताब्यात घेऊन मशिदीचे मंदिरात रूपांतरण केले असल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओचा केरळशी काहीही संबंध नाही. कर्नाटकातील मंगळूर येथील झीनत बख्श या अतिप्राचीन मशिदीचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

हेही वाचा- हिंदुत्ववादी संघटनांचा छत्तीसगडमधील मशिदीत घुसून धुडगूस? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा