Press "Enter" to skip to content

खरंच मालाडमध्ये मुस्लिम युवकांनी दुर्गा पूजा बंद पाडली ?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओत एक तरुण आपल्या साथीदारांसह कुठल्याशा ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना धमकावून त्या ठिकाणी सुरु असलेलं संगीत बंद करायला सांगतोय. सोबतच हा तरुण ‘मालोनी में रहेना है, तो अस्लम भाई- अस्लम भाई कहेना है, यहां मोदीजी नहीं आयेंगे अस्लम भाई ही आयेंगे’ असंही म्हणताना (aslam bhai kehna hoga) दिसतोय. सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय की हा व्हिडीओ मुंबईतील मालाड येथील असून काही मुस्लिम युवक दुर्गा पूजा बंद पाडताहेत.

Advertisement

दुर्गा पंडाल में घुसकर भजन बंद करवा कर बोला, "कॉलोनी में रहना है तो असलम भाई कहना है, यहां मोदी नहीं आएगा !"मलाड मुंबई की घटना !पंडाल में अजान करवाकर उसे साम्प्रदायिक सद्भाव की मिसाल बताने वाले न्यूज़ चैनल में दम है ये खबर दिखाने की !

Posted by Ashish Bamnodkar on Saturday, 17 October 2020

अर्काइव्ह पोस्ट

दुर्गा पंडाल में घुसकर भजन बंद करवा कर बोला, "कॉलोनी में रहना है तो असलम भाई कहना है, यहां मोदी नहीं आएगा !"मलाड मुंबई की घटना !पंडाल में अजान करवाकर उसे साम्प्रदायिक सद्भाव की मिसाल बताने वाले न्यूज़ चैनल में दम है ये खबर दिखाने की ! महाराष्ट्र प्रदेश के महानगर मुंबई के मलाड की घटना।।कॉंग्रेस NCP SS ये देखे.. 👇🏻👇🏻

Posted by Pratik Guraw on Sunday, 18 October 2020

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी :

पडताळणी दरम्यान आमच्या लक्षात आले की सध्या नव्याने व्हायरल होत असलेला व्हिडीओ गेल्या वर्षी देखील व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे काही माध्यमांनी या व्हिडिओच्या आधारे बातम्या देखील प्रसिद्ध केल्या होत्या. ‘न्यूज नेशन’ या न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर या संदर्भातील बातमी अजून देखील उपलब्ध आहे. ‘ऑप-इंडिया’ आणि ‘स्वराज्य’ पोर्टलवर देखील यासंबंधीच्या बातम्या बघायला मिळाल्या.

Aslam bhai Durga pendol fake news by rightist media checkpost marathi
Source: opindia/newsnation/swaraj

आम्हाला बीबीसीच्या वेबसाईटवर एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार व्हायरल व्हिडीओ गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये लोकांना धमकावताना भासणारी व्यक्ती मुस्लिम नसून हिंदू आहे. आशिष सिंह असे व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव असून आपण स्वतः हिंदू आहोत आणि केवळ मनोरंजनाच्या उद्देश्याने हा व्हिडीओ बनवला होता, असं त्यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितल होतं.

व्हिडिओत ज्या व्यक्तीला ‘अस्लम भाई’चे नाव (aslam bhai kehna hoga) घेण्यासाठी धमकावले जात असल्याचं भासवलं जातंय, त्या व्यक्तीचं नाव रविशंकर दुबे आहे. मनोरंजनासाठी बनविण्यात आलेला व्हिडीओ धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापरला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर रविशंकर दुबे यांच्याकडून मालोनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

Complaint letter to Malwani police checkpost marathi

आशिष सिंह हे आपले चांगले मित्र असून आपल्याला अस्लम भाईचं नाव घेण्यासाठी धमकावण्यात आलं नव्हतं. व्हिडीओ केवळ सोशल मीडियावर मित्रांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने बनविण्यात आला होता, असं दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटलं होतं. 

आशिष सिंह यांच्या फेसबुक प्रोफाइलनुसार ते जिम मालक असून युवा एकता सामाजिक संस्थेचे सदस्य आहेत. त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट आणि फोटोजवरून ते महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांचे कार्यकर्ते असल्याचं देखील लक्षात येतंय.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला व्हिडीओ सध्याचा नसून वर्षभरापूर्वीचा आहे.

व्हिडीओ वास्तविक नसून व्यंगात्मक आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनविण्यात आला होता. शिवाय सोशल मीडियावरील दाव्यांप्रमाणे व्हिडिओत दिसणारी व्यक्ती देखील मुस्लिम नसून हिंदू आहे. आशिष सिंह असं व्हिडिओत दिसणाऱ्या व्यतीचे नाव आहे.

हे ही वाचा- भारतीय सैन्याच्या ‘मुस्लिम रेजिमेंट’ने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध लढायला नकार दिला होता?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा