Press "Enter" to skip to content

मुस्लीम महिलांनी दुबईत राम भजन गायले का? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुस्लिम महिला भजन गाताना दिसताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ दुबईमधील आहे. ‘दुबईत मुस्लीम महिलांनी राम भजन गायले , हेच जर आपल्या देशात झालं असतं तर प्रलय आला असता.’ अशा दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील बुरखा परिधान केलेल्या महिला राम भजन गातानाचा हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हायरल होतोय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्यास सुरुवात केली असता असे लक्षात आले की हे दावे 2017-18 सालापासूनच व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या असता आम्हाला 17 जुलै 2012 रोजी युट्युबवर ‘श्री सत्य ऑफिशियल’ या युट्युब चॅनलवरील एक व्हिडीओ मिळाला.

साधारण तासाभराच्या या व्हिडीओमध्ये 44 व्या मिनिटाला व्हायरल व्हिडीओतील दृश्ये दिसू लागतात.

संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यास असे लक्षात येईल की जमलेल्या भक्तांनी अगोदर ‘अल्लाहू अकबर’ म्हणत मुस्लीम गीत गायले आणि नंतर हिंदू प्रार्थनासुद्धा गायल्या. सत्य साई बाबा इंटरनॅशनल ऑर्गेनायजेशनने ‘द क्विंट’ला दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात दिसणाऱ्या सर्वच महिला मुस्लीम नव्हत्या. भारतीय हिंदू मुस्लिमांचाही समावेश यात होता.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जी माहिती दिलीय त्यानुसार सत्य साई बाबाच्या ‘प्रशांती’ येथील आश्रमाचा हा व्हिडीओ आहे. येथे बहरीन, ईरान, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब, सीरिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमीरात यांसारख्या तब्बल 94 अखाती देशांतील अनुयायी जमले होते.

प्रशांती आश्रम सत्य साईबाबाचा प्रमुख आश्रम होता. तो दुबईमध्ये नव्हे तर आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ दुबईचा नसून भारतातीलच आहे. सत्य साईबाबा आश्रमात आखाती देशांतील भक्त, भारतीय भक्त एकत्र आले होते तेव्हा हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मांची गीते, भजने गायली गेली होती.

हेही वाचा: कलम ३७० काय हटवले फारुख अब्दुल्ला भजन गाऊ लागले? वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा