Press "Enter" to skip to content

प्रियंका गांधींच्या लग्न समारंभातील विधी मुस्लिम मौलवींनी पार पाडले होते?

सोशल मीडियावर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोमध्ये प्रियंका गांधी, राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासह एक अजून एक वयोवृद्ध व्यक्ती दिसतेय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की ही वयोवृद्ध व्यक्ती मौलवी असून ती प्रियंका गांधी यांचा ‘निकाह’ पढण्यासाठी या समारंभात उपस्थित होती.

Advertisement

“सबुत सबुत करते हो चमचो ये रहा सबुत ! प्रियंका गांधी के निकाह में पधारे थे महान मौलवी।। हरामी लोग हिन्दू बोलकर हिन्दुओ का अपमान करते है। सबूत देखलो कायरो तुम्हे मूर्ख बनाने वाले मुस्लिम है।। काजी साहब निकाह पढ़ने आये थे” अशा कॅप्शनसह हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

Source: Facebook

ट्विटरवर यापूर्वी देखील हाच फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये मौलवीचे नाव शफीकुर्र रहमान विर्क असल्याचे सांगण्यात आले होते.

अर्काइव्ह

वस्तुस्थिती:

व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही गुगलवर किवर्डच्या आधारे शोध घेतला. आम्हाला ‘डेली ओ’ या वेबसाईटवर पत्रकार रशीद किडवई (Rasheed Kidwai) यांनी प्रियंका गांधी यांच्यावर लिहिलेला एक लेख सापडला.

लेखामध्ये किडवई यांनी प्रियंका गांधींच्या लग्नाच्या संदर्भाने गांधी घराण्याचे कौटुंबिक पुजारी पंडित इक्बाल किशन रेऊ (Iqbal Kishan Reu) यांचा उल्लेख केला आहे. विवाह समारंभातील सर्व विधी रेऊ यांनीच पार पाडल्याची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

Source: DailyO

‘अल्ट न्यूज’नुसार पंडित इक्बाल किशन रेऊ हे काश्मिरी पंडित होते. पंडित तेज किशन रेऊ यांचे जेष्ठ चिरंजीव असणारे इक्बाल किशन रेऊ हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी होते. शिवाय त्यांना काश्मिरी विधींचे ज्ञान असल्याने ते धार्मिक विधी देखील पार पाडायचे. प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा विवाह पार पाडल्यानंतर रेऊ यांनी हे काम बंद केले.

Source: Kashmir Sentinel

पंडित इक्बाल किशन रेऊ यांच्या मोठ्या भावाचे नाव स्वरूप किशन रेऊ होते. स्वरूप किशन हे काश्मीरमधून येणारे पहिले क्रिकेट अंपायर होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

काँग्रेस प्रवक्त्यांनी माध्यमांशी प्रियांका गांधींच्या विवाह समारंभातले फोटोज देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका गांधी हिंदू रिती रिवाजानुसार पूजा करत असल्याचे बघायला मिळतेय.  

Priyanka gandhi Marriage photos_ Checkpost Marathi fact

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या लग्नासंदर्भात केले जाणारे दावे चुकीचे आहेत. प्रियंका गांधींचे लग्न मुस्लिम मौलवींनी नाही तर काश्मिरी पंडित इक्बाल किशन रेऊ यांनी लावले होते. लग्नातील सर्व विधी त्यांनीच पार पाडले होते. रेऊ हे गांधी घराण्याचे कौटुंबिक पुजारी होते. व्हायरल फोटोत प्रियंका यांच्यासह दिसणारी व्यक्ती पंडित इक्बाल किशन रेऊच आहेत.

हेही वाचा- पंडित नेहरू आणि मुहम्मद अली जिन्ना सावत्र भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्ट्स फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा