Press "Enter" to skip to content

मोहन भागवतांनी घेतली ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशींची भेट?

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाच्या संदर्भाने एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी बघायला दिसताहेत. दावा केला जातोय की सरसंघचालकांनी नुकतीच विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची भेट घेऊन ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.  

Advertisement

सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे मोहन भागवत यांनी केल्याचे सांगण्यात येतेय. ‘लोकमत’ आणि ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर यासंदर्भातील बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

Lokmat Divya Marathi news about Mohan Bhagwat and Kashmir Files creaters
Source: Lokamat/ Divya Marathi

पडताळणी:

माध्यमांच्या बातम्यांमध्ये वापरण्यात आलेला फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता विवेक अग्निहोत्री यांच्याच 26 एप्रिल 2019 रोजीच्या ट्विटमध्ये हा फोटो बघायला मिळाला. ट्विटमध्ये या फोटोसोबतच एका बातमीचे कात्रण देखील बघायला मिळतेय. यामधील माहितीनुसार सदर फोटो विवेक अग्निहोत्री यांच्याच ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंग वेळचा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील ‘रेशीमबाग’ या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत आणि संघातील इतरांसाठी या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट बघितल्यानंतर मोहन भागवत यांनी ‘द ताश्कंद फाइल्स’ हा “आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात प्रामाणिक, निष्पक्ष, संतुलित आणि महत्त्वपूर्ण दस्तऐवज” असल्याची प्रतिक्रिया दिल्याचे अग्निहोत्रींनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले होते.

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी संचालित ‘आय एम बुद्धा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वेबसाइटवरून देखील 26 एप्रिल 2019 रोजी ‘द ताश्कंद फाइल्स’च्या विशेष स्क्रिनिंगची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीमध्ये देखील सध्या व्हायरल होत असलेला फोटो बघायला मिळतोय.

Mohan Bhagwat met Vivek Agnihotri and Pallavi Joshi
Source: I am Buddha

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोशल मीडिया प्रमुख राजीव तुली यांनी देखील नजीकच्या भूतकाळात मोहन भागवत यांनी विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशींची भेट घेतल्याचा दावा फेटाळून लावलाय. “सोशल मीडियावरील व्हायरल फोटो तीन वर्षे जुना असून सरसंघचालक मोहन भागवत अलीकडच्या काळात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना भेटलेले नाहीत” असे राजीव तुली यांनी सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशींची भेट घेतलेली नाही. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो जवळपास तीन वर्षे जुना आहे.

हेही वाचा‘द काश्मीर फाइल्स’ बघून योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा