Press "Enter" to skip to content

मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागत होती?

सोशल मीडियावर २० सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतरही नेते दिसताहेत. व्हिडिओमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) केक कापताना दिसताहेत. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जातोय की मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाचा केक कापण्याची देखील परवानगी नव्हती. यांच्या वाढदिवसाचा केक त्यांनी नाही तर राहुल गांधी यांनी कापला होता.

भाजप महिला मोर्चाच्या प्रीती गांधी (Priti Gandhi) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. प्रीती गांधींचं ट्विट ११०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट केलं गेलंय.

Advertisement

अर्काइव्ह

भाजपचे राष्ट्रीय राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी (C T Ravi) यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडीओ शेअर करताना ते लिहितात, “त्यांना त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्याचीही देखील परवानगी नव्हती. केवळ मूर्ख आणि वेडपट लिबरल लोकंच विश्वास ठेऊ शकतील त्यांनी दहा वर्षे देशाचं सरकार चालवलं”

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठल्या प्रसंगाचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगल किवर्डसची मदत घेतली. गुगलवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला ‘एनडीटीव्ही’च्या युट्यूब चॅनेलवरील बातमी मिळाली. या बातमीनुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त केक कापला होता.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Indian National Congress) युट्यूब चॅनेलवरून देखील हा व्हिडीओ शेअर अपलोड करण्यात आला होता. २८ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसच्या स्थापनेला १३४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी केक कापला होता. या केक कापण्याशी मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा काहीएक संबंध नाही.

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी देखील आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून या प्रसंगीचे फोटोज शेअर केले होते. यामध्ये मनमोहन सिंग आणि राहुल गांधी दोघेही केक कापत असताना दिसताहेत. शिवाय काँग्रेसमधील इतरही दिग्ग्ज नेते फोटोमध्ये बघायला मिळताहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडीओ मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नसून काँग्रेसच्या स्थापना दिनाचा आहे.

हेही वाचा- नीरव मोदीकडून कॉंग्रेसने ४५६ कोटी रुपये घेऊन फरार होण्यास मदत केली? वाचा सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा