Press "Enter" to skip to content

ममता बॅनर्जी यांनी पोलिसांकडून नमाजसाठी मशिदीची साफसफाई करून घेतली?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोत मुस्लिमांच्या पारंपरिक वेशातील काही लोक आणि साफसफाई करणारे पोलीस दिसताहेत. फोटोच्या आधारे दावा केला जातोय की हे दृश्य पश्चिम बंगालमधील असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नमाजसाठी पोलिसांकडून मशिदीची साफसफाई करून घेतली.

Advertisement

“क्या आपने कभी पुलिस को देखा है मन्दिर साफ करते हुए..? नहीं ना ..? पर….बंगाल में ममता दीदी की पुलिस, मस्जिद साफ कर रही है, नमाज के लिए.. देखिये” अशा कॅप्शनचा स्क्रिनशॉट शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा स्क्रिनशॉट शेअर केला जातोय. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजय कदम यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

व्हायरल फोटो लक्ष्यपूर्वक बघितला असता फोटोच्या उजव्या कोपर्‍यात ‘SK TOYS’ नावाचा बोर्ड बघायला मिळतोय. गुगलवर ‘SK TOYS TELANGANA’ सर्च केलं असता तेलंगणामधील भैंसा येथे ‘SK TOYS WORLD’ नावाचे खेळण्यांचे दुकान असल्याचे आढळून आले. या दुकानवरचा बोर्ड आणि व्हायरल फोटोतील बोर्ड एकमेकांशी जुळणारे असल्याचे लक्षात येते.

SK Toys in viral image

याच माहिती आधारे गुगल सर्च केले असता ‘AK News’च्या फेसबुक पेजवरून अशाच प्रकारचे काही फोटोज मिळाले. 18 जून 2016 रोजीच्या या पोस्टमध्ये रमजानच्या निमित्ताने भैंसा पोलिसांनी पंजेशा मरकजची साफसफाई केली असे कॅप्शन आहे. व्हायरल होत असलेल्या फोतोचाही यात समावेश आहे.

आमच्या पडताळणीत हे सुद्धा स्पष्ट झाले की तेलंगाना पोलीस केवळ मस्जिदीचीच साफसफाई करत नाहीत तर त्यांनी इतरही विविध भागांत सफाई केली होती. आम्हाला तेलंगणा पोलिसांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून जून 2016 मध्ये टाकण्यात आलेली पोस्ट देखील मिळाली.

या पोस्टमध्ये तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांनी भैंसा आणि मुधोळे येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंदिरे आणि मशिदींची स्वच्छता आणि वृक्षारोपण केल्याची माहिती देण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल फोटो पश्चिम बंगालमधील नसून तेलंगणा राज्यातील भैंसा येथील आहे. शिवाय तेलंगाणा पोलिसांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केवळ मशिदीचीच नव्हे तर मंदिरांची देखील साफसफाई केली होती. तेलंगाणा पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरून यासंदर्भातील फोटोज पोस्ट करण्यात आले होते.

हेही वाचा- त्रिपुरा दंगलीत पोलिसांनी मुस्लिमांविरोधात हिंदुना मदत केल्याचे ‘बीबीसी’ व्हिडीओसोबतचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा