Press "Enter" to skip to content

‘जो बायडन’ यांनी व्हाईट हाउसमध्ये प्रवेश करताना हिंदू मंत्राचे पठन करून घेतले?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेल्या जो बायडन यांनी व्हाईट हाउसमध्ये प्रवेश करण्याच्या पहिल्या दिवशी मंत्रोच्चार आणि श्लोकांचे पठन करून घेतले (Joe Biden recite Vedic mantra) असा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

‘अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश करण्यापूर्वी भारतीय श्लोकानी सुरुवात (Joe Biden recite Vedic mantra)करण्यात आली. आपल्याकडच्या secularists ना दाखवा. यालाही अंधश्रद्धा म्हणून हीनवणार का ?’ या कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होतोय.

फेसबुकवर अनेकांनी हा व्हिडीओ याच कॅप्शनसह शेअर केलाय. ते आपण ‘येथे‘ क्लिक करून पाहू शकता.

अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश करण्यापूर्वी भारतीय श्लोकानी सुरुवात करण्यात आली. आपल्याकडच्या secularists ना दाखवा. यालाही अंधश्रद्धा म्हणून हीनवणार का ?

Posted by Hitesh Sangita Shantilal on Wednesday, 25 November 2020

अर्काइव्ह लिंक

ट्विटरवर सुद्धा वकील असणाऱ्या केदार धर्मे या युजरने हेच दावे करणारे ट्विट केले आहे.

व्हॉट्सऍप या दाव्यांचे बळी पडणार नाही हे तर अशक्यच. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निसार अली यांनीच हे असे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

सर्वात आधी आम्ही व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले. एका फ्रेममध्ये मागे पडद्यावर प्रोजेक्ट झालेल्या काही गोष्टी वाचण्याचा आम्ही प्रयत्न केला.

व्हाईट हाउसच्या लोगो खाली ‘Dharmic Dialogue : Seva and Social Justice’असे लिहिल्याचे आढळले. त्याच खाली गणपतीच्या आकाराखाली ‘Hindu American Seva Communities’ असं काहीतरी लिहिल्याचं जाणवलं.

screenshot of viral video to tell function is about Dharmic Dialogue Seva and Social Justice

याच कीवर्ड्सचा आधार घेऊन सर्च केले असता ‘हिंदू अमेरिकन सेवा कम्यूनीटी’च्या युट्युब चॅनलवर १५ ऑक्टोबर २०१४ रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ म्हणजे व्हायरल व्हिडीओचे स्पष्ट आणि मूळ व्हर्जन आहे. यावर ‘वैदिक मंत्रोच्चार- व्हाईट हाउस’ असे लिहिले आहे.

याविषयी अजून माहिती मिळवण्यासाठी ‘हिंदू अमेरिकन सेवा कम्यूनीटी’च्या ऑफिशियल वेबसाईटवर शोधाशोध केली असता इव्हेंट सेक्शनमध्ये २०११ ते २०१४ या वर्षांत हे असे मंत्रोच्चाराचे इव्हेंट झाले असल्याचे समजले.

प्रेस रिलीजवरील माहितीनुसार २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कॉन्फरन्सची सुरुवात गांधीजींच्या आवडत्या ‘गणपती प्रार्थना’ आणि ‘रुद्र नामकरण’ या श्लोकांचे पठन करण्यात आले होते.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठीच्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओसोबत करण्यात आलेले दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. सदरचा व्हिडीओ व्हाईट हाउसमध्ये झालेल्या श्लोक पठनाचा आहे हे खरे असले तरी हा २०१४ सालचा व्हिडीओ आहे. त्याचे निमित्तसुद्धा वेगळे आहे.

जो बायडन निवडणूक जिंकले असले तरीही त्यांचा शपथविधी झाल्याशिवाय त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची पूर्ण सूत्रे हातात घेता येणार नाहीत. २० जानेवारी २०२१ रोजी शपथविधी आहे.

हेही वाचा: हिंदू देव-देवतांची चित्रे असलेले गुप्तपणे बनलेले संविधान २०२४ मध्ये लागू होणार?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा