Press "Enter" to skip to content

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात महिला कार्यकर्त्यांसोबत थिरकले शशी थरूर? वाचा सत्य!

राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुकतेच काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. आता सोशल मीडियावर शशी थरूर (Shashi Tharoor)  यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरातील असल्याचे सांगण्यात येतेय. व्हिडिओमध्ये शशी थरूर एका हिंदी गाण्यावर थिरकत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसलेले दिसताहेत. हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की उदयपूरच्या शिबिरामध्ये अशा प्रकारचे गंभीर चिंतन केले गेले.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओ न्यूज18 केरळच्या यूट्यूब चॅनेलवरून अपलोड केला गेला असल्याचे आढळून आले. चॅनेलवर 19 मे 2022 रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. त्यानुसार शशी थरूर यांचा हा व्हिडिओ केरळमधील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत भीष्म पर्व ट्रेंड स्टेपचा आहे.

युट्यूबवरच अजून एका रिपोर्टमध्ये देखील आम्हाला हा व्हिडीओ बघायला मिळाला. या रिपोर्टनुसार काँग्रेस नेते शशी थरूर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये ते महिला कार्यकर्त्यानी निवडणूक प्रचारासाठी बनवलेल्या एका गाण्यावर थिरकताना बघायला मिळाले.

शशी थरूर यांनी स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 18 मे 2022 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी “माझा आजचा चंबिको क्षण” असे कॅप्शन दिले होते.

वाचकांच्या माहितीस्तव “चंबिको” हे मामूट्टीच्या भीष्म पर्वम चित्रपटातील संस्मरणीय दृश्य आहे. याचा अर्थ फोटो काढा असा होतो. सोशल मीडियावर ग्रुप फोटो पोस्ट करणाऱ्यांमध्ये ‘चंबिको’ हा शब्द लोकप्रिय आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शशी थरूर यांचा व्हिडीओ काँग्रेसच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरातील नसून केरळमधील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमातील आहे.

हेही वाचा- बॉक्सिंगपटू निखत झरीनचा तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडून तब्बल 50 लाखांचा चेक देऊन गौरव? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा