Press "Enter" to skip to content

‘भाजप’ने भर न्यायालयात मागितली गांधी परिवाराची माफी? वाचा सत्य!

गांधी परिवारावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी सीबीआयला एकही ठोस पुरावा सापडला नाही. त्यामुळे शेवटी ‘भाजप’ने भर न्यायालयात गांधी परिवाराची माफी मागितल्याचा (BJP apologize to Gandhi family) दावा करणारा मजकूर असलेले ‘आज तक’चे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement

‘गांधी परिवार के खिलाफ सीबीआई नहीं ढूंढ पाई एक भी भ्रष्टाचार का एक भी सबूत, कोर्ट मे गांधी परिवारसे भाजपा ने मांगी माफी’ असं ट्विट व्हायरल होतंय. २७ ऑगस्ट २०२१ रोजी ८.३७ वाजता हे ट्विट केल्याचे दिसत आहे.

Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दत्तू गवाणकर आणि राजन यांनी सदर स्क्रिनशॉटच्या सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्स वापरून गुगलसर्च केले त्यामध्ये ‘भाजपने गांधी परिवाराची माफी मागितली’ किंवा ‘सीबीआयला पुरावे मिळाले नाहीत’ अशा संदर्भातील एकही बातमी मिळाली नाही.

सदर बातमी जर खरी असती तर अर्थातच सर्व राष्ट्रीय माध्यमांत याविषयी बातम्या आल्या असत्या. वृत्तवाहिन्यांवर दिवसभर त्या बातम्या आणि चर्चांना उधाण आले असते. परंतु तसे काहीच झाले नाही म्हणजेच ती फेक असावी असा अंदाज आम्हाला आला.

‘आज तक’ने अशी काही बातमी दिली किंवा तसे ट्विट केले होते का? हे तपासण्यासाठी आम्ही ‘आज तक’च्या अधिकृत ट्विटर हँडलवर शोधाशोध केली असता त्या व्हायरल स्क्रिनशॉटला ‘फेक’ सांगणारे त्यांचे ट्विट आम्हाला मिळाले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ‘सीबीआय’ला गांधी परिवाराच्या भ्रष्टाचाराविषयी एकही पुरावा मिळाला नाही, ‘भाजप’ने भर न्यायालयात मागितली गांधी परिवाराची माफी मागितल्याचा (BJP apologize to Gandhi family) दावा करणारा मजकूर असलेला ‘आज तक’चा ट्विट स्क्रिनशॉट फेक असल्याचे निष्पन्न झाले. ‘आज तक’कडून देखील हे ट्विट फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: ‘पुलवामा हल्ला भाजपची नियोजनबद्ध चाल होती’, विंग कमांडर अभिनंदन यांचा खुलासा? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा