Press "Enter" to skip to content

अर्णब गोस्वामी यांनी बेधुंद डान्स करत साजरा केला उद्धव ठाकरेंचे सरकार पडल्याचा आनंद? वाचा सत्य!

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना टीव्ही न्यूज अँकर अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि महाराष्ट्र सरकार अनेकवेळा एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र बघायला मिळाले. फेक टीआरपी प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना तुरुंगवास देखील भोगायला लागला होता.

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये अर्णब गोस्वामी डान्स करताना बघायला मिळताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरचा आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी बेधुंदपणे डान्स करत सरकार पडल्याचा आनंद साजरा केला असल्याचे सांगण्यात येतेय.

अर्काइव्ह

पडताळणी:

युट्यूबवर किवर्डसच्या मदतीने शोध घेतला असता 8 मार्च 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. सोशल मीडियावर सध्या हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ साधारणतः वर्षभरापेक्षा अधिक काळापासून यूट्युबवर उपलब्ध असल्याने या व्हिडिओचा सध्याच्या राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नाही, हे येथेच स्पष्ट झाले.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा हे शोधण्यासाठी आम्ही आमची पडताळणी सुरूच ठेवली. आम्हाला युटयूबवरच 11 फेब्रुवारी 2010 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. यामध्ये हा व्हिडीओ ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या लॉन्चिंग पार्टीमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टाईम्स नाऊच्या एका माजी कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओ ‘टाईम्स नाऊ’च्या लॉन्चिंग पार्टीमधला नसून ‘टाईम्स नाऊ’चा लोगो पक्का करण्यात आलेल्या वेळचा आहे. ही पार्टी 2 जुलै 2005 रोजी झाली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या डान्सच्या व्हिडिओचा सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ जवळपास ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचा लोगो ठरल्यानंतरच्या पार्टीमधील आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा