Press "Enter" to skip to content

मुलायम सिंह यांच्या आशिर्वादानेच झाला अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या वहिनी अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशमध्ये अनेक दिग्गज नेते भाजपला सोडचिट्ठी देत असताना थेट यादव घराण्यातील व्यक्तीच्या भाजप प्रवेशाने या घटनेची बरीच चर्चा झाली.

Advertisement

सध्या सोशल मीडियावर अपर्णा यादव आणि मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोसोबत दावा केला जातोय की अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश सासरे मुलायम सिंह यादव यांच्या आशीर्वादानेच झाला आहे.

अर्काइव्ह

अशाच प्रकारचा दावा करणारे ग्राफिक देखील व्हायरल होतेय.

पडताळणी:

अपर्णा यादव आणि मुलायम सिंह यादव यांचा व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता अपर्णा यादव यांच्याच अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 1 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हा फोटो बघायला मिळाला. आईच्या वाढदिवशी आईचा आशीर्वाद घेतल्याचे अपर्णा या ट्विटमध्ये सांगतात.

सप्टेंबर 2021 नंतरच्या काळात अपर्णा समाजवादी पक्षातच सक्रिय होत्या. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 16 जानेवारी रोजी त्यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह रामानंद आश्रमात जाऊन खिचडी वितरण केल्याचे त्यांच्या ट्विटवरून समजतेय.

दरम्यान, अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना अपर्णा यादव यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच मुलायम सिंह यादव यांनी अपर्णा यादव यांना समजावून सांगण्याचे अनेक प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश येऊ शकले नसल्याचे सांगितले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अपर्णा यादव यांचा मुलायम सिंह यादव यांच्या सोबतचा फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.  

हेही वाचा- अखिलेश यादव छुप्या पद्धतीने मुस्लिम धार्जिणी आश्वासने देत असल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा