Press "Enter" to skip to content

आमिर खानने स्वतःच ‘लाल सिंह चड्ढा’ बघायचा नसल्यास नका बघू असं म्हंटलंय?

लवकरच आमिर खान (Aamir Khan) अभिनित ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र सोशल मीडियात या चित्रपटाचा बहिष्कार करण्यासाठी अभियाने चालवली जात आहेत. आता सोशल मीडियावर आमिर खानची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय.

Advertisement

सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये आमिर खान कुठलीशी मुलाखत देत असताना बघायला मिळतोय. या मुलाखतीत आमिर म्हणतोय की ही लोकशाही आहे आणि प्रत्येक माणसाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. जर कुणाला चित्रपट आवडला नसेल, तर त्याने तो बघू नये. या क्लिपच्या आधारे दावा केला जातोय की आमिरने स्वतःच ‘लाल सिंह चड्ढा’ बघायचा नसल्यास बघू नका असं म्हंटलंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने सर्च केल्या असता आम्हाला झूमच्या युट्यूब चॅनेलवर 31 डिसेंबर 2014 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ रिपोर्ट बघायला मिळाला. यामध्ये अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी बघायला मिळताहेत.

आमिर खान आणि राजकुमार हिरानी हे दोघे त्यावेळी आपल्या ‘पीके’ या चित्रपटाच्या संदर्भाने बोलत होते. आमिर खान सोशल मीडियावर पीके चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भात चालविण्यात येत असलेल्या मोहिमांच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होता. संपूर्ण मुलाखत आपण खाली बघू शकता.

जिथपर्यंत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावरील बहिष्काराच्या मोहिमेचा विषय आहे, तर आमिर खानने स्वतः याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी चालवली जाणारी अभियाने बघून वाईट वाटतं. अशा प्रकारची अभियाने चालवल्या लोकांच्या मनात मला भारताबद्दल प्रेम नसल्याची भावना आहे, याबद्दलही आपल्याला वाईट वाटतं, असं सांगत आमिरने प्रेक्षकांना चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपच्या आधारे केले जाणारे दावे चुकीचे आहेत. आमिर खानने स्वतःच ‘लाल सिंह चड्ढा’ बघायचा नसल्यास नका बघू असं म्हंटलेले नाही. व्हायरल व्हिडीओ जुना असून आमिरने पीके चित्रपटाला केल्या जाणाऱ्या विरोधाच्या संदर्भात अशा प्रकारचे विधान केले जात होते. या विधानाचा सध्याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या बहिष्काराच्या वादाशी काहीही संबंध नाही. आमिरने स्वतः आपल्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात हा चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा- ‘हर हर शंभू’ गाण्याच्या मूळ गायिकेने फरमानी नाझवर आपले गाणे चोरल्याचा आरोप केल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा