सोशल मीडियात दोन व्हिडीओज व्हायरल होताहेत. एक सीसीटीव्ही फुटेज असून त्यात चालत्या स्कूटरचा मोठा स्फोट झाल्याचे दिसतेय आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये अतिशय भयंकर पद्धतीने छिन्नविच्छिन्न झालेले शरीर दिसतेय. दावा केला जातोय की ती इलेक्ट्रिक स्कूटर होती.
दुसरा व्हिडीओ वाचकांना विचलित करणारा असल्याने तो आम्ही अपलोड करू शकत नाही. पहिला व्हिडीओ आपण ‘येथे‘ पाहू शकता.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शैलेश चौधरी आणि करण गायकवाड यांनी सदर व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. वाचक रुपेश पोळ यांनी पडताळणीसाठीची महत्वाची माहिती देऊन ‘चेकपोस्ट मराठी’ला मोठी मदत केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्च केल्या असता काही बातम्या बघायला मिळाल्या. त्यापैकी ‘इंडिया टीव्ही’च्या बातमीमध्ये अधिक वस्तृत माहिती आहे.
५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध बातम्यांनुसार दिवाळीच्या काळात पदुच्चेरी येथे वडील आणि मुलगा फटाके घेऊन घरी जात असताना हा स्फोट झाला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला तसेच जवळून जाणारे तीन जण गंभीर जखमी झाले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की स्कूटरचा स्फोट फटाक्यांमुळे झाला होता. या व्हिडीओतील घटनेचा इलेक्ट्रिक स्कूटरशी काहीएक संबंध असल्याचा कुठेही उल्लेख नाही.
हेही वाचा: सोमालियातून आयात केलेल्या केळीमध्ये हेलिकोबॅक्टर नावाची जीवघेणी अळी आहे? वाचा सत्य?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा झाला स्फ… […]
[…] हेही वाचा: चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा झाला स्फ… […]