Press "Enter" to skip to content

रुद्राक्षाची माळ घातल्यामुळे हिंदू विद्यार्थ्याला ख्रिश्चन शिक्षकाने अमानुष मारहाण केली?

सुदर्शन न्यूजच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये कुठल्याशा शाळेतील वर्गात शिक्षक विद्यार्थ्याला छडीने आणि लाथांनी मारहाण करताना दिसताहेत.

सुदर्शन न्यूजकडून दावा करण्यात आलाय की व्हिडीओ तामिळनाडूतील शासकीय शाळेतील असून व्हिडिओत दिसणाऱ्या मुलाला गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्याबद्दल ख्रिश्चन शिक्षकाकडून अमानुष मारहाण केली जात आहे. ख्रिश्चन शिक्षक केवळ अमानुष मारहाण करूनच थांबला नाही, तर त्याने विद्यार्थ्याला शाळेतून हाकलून दिले, असेही सुदर्शन न्यूजकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

अर्काइव्ह

सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केलाय. चव्हाणके यांचं ट्विट ५५०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट केलं गेलंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

गुगल किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला ‘न्यूज १८ लोकमत’च्या वेबसाईटवर १८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित बातमी मिळाली. बातमीनुसार संबंधित घटना तामिळनाडूमधील कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम येथील उच्च माध्यमिक शाळेतील आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करत असलेल्या शिक्षकाचं नाव सुब्रमण्यम असून ते फिजिक्स विषयाचे शिक्षक आहेत. 

News 18 lokmat news about Tamilnadu teacher rigorous punishment to student for bunking the class
Source: News18 Lokmat

विद्यार्थी फिजिक्सच्या तासाला वर्गात गैरहजर असल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती. शिक्षक सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ वर्गातीलच काही विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

‘सकाळ’ने देखील व्हायरल व्हिडीओ विषयीची बातमी दिली होती. बातमीनुसार याप्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मिशन आंबेडकर’ या फोरमच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून साधारणतः तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. तामिळनाडूतील सरकारी शाळेतील फिजिक्सच्या शिक्षकाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला केलेली अमानुष मारहाण शालेय पातळीवरील जातीय क्रूरता दर्शवणारी असल्याचे या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘सुदर्शन न्यूज’ आणि या चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी शेअर केलेल्या व्हिडिओसोबतचे दावे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.

व्हायरल व्हिडिओतील विद्यार्थ्याला रुद्राक्षाची माळ घातल्याबद्दल नव्हे, तर कॉलेजच्या तासाला अनुपस्थित राहिल्याबद्दल  शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली होती. व्हिडिओतील आरोपी शिक्षकाचे नाव सुब्रमण्यम असून ते ख्रिश्चन धर्मीय असल्याचे दावे देखील चुकीचे आहेत.

हेही वाचा- ‘कोव्हीड१९’ची लस घेतल्याने भारतीय सैनिक बेशुद्ध पडताहेत?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा