Press "Enter" to skip to content

डॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधातील भाजप नेते व समर्थकांच्या फेक दाव्यांची झाडाझडती!

माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ, कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधात शरसंधान साधण्यासाठी विरोधकांकडून, विशेषतः भाजप नेते आणि समर्थकांकडून आजवर अनेक फेक दावे करण्यात आले. त्यातीलच महत्वाच्या पाच दाव्यांची पुराव्यानिशी झाडाझडती घेणारा हा स्पेशल रिपोर्ट! (fake news against Dr Manmohan Singh)

१.दावा:

नरेंद्र मोदींपेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांच्या पाच वर्षातल्या विदेशवाऱ्या जास्त आहेत- अमित शहा

भाजप नेते अमित शहा यांनी भर सभेत असा दावा केला होता की दर वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवाऱ्यांवर बोललं जातं पण खरे पाहता पाच वर्षाच्या काळात डॉ. सिंह यांच्या परदेशवाऱ्या मोजल्यावर त्या मोदींपेक्षा जास्त भरल्या. (fake news against Dr Manmohan Singh)

काय म्हणाले ते सभेत वाचा:

“अभी अभी कांग्रेस के एक नेता बोलते थे , कि मोदीजी विदेशो में घुमते हैं , मैंने बोला जांच करा , के मनमोहनजी के 5 साल और मोदीजी के 5 साल ज़्यादा विदेश में कौन गया देखो भाई, तो मालूम पड़ा मोदीजी कम गए हैं और मनमोहन सिंह ज़्यादा गए हैं। तो मेरे मन में सवाल उठा कि दीखता तो ऐसा है कि मोदीजी ज़्यादा गए हैं , ऐसा क्यों हुआ ?”

Advertisement

वस्तुस्थिती:

या दोन्ही पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात कुठे, किती वेळा परदेशगमन केले याची माहिती मिळवण्यासाठी PM INDIA आणि ARCHIVE PMO या दोन अधिकृत वेबसाईटवरील माहितीची मदत झाली. यावरील माहितीनुसार काय आकडेवारी समोर आली पहा.

  • डॉ. मनमोहन सिंह त्यांच्या पहिल्या म्हणजे २००४ ते २००९ या पाच वर्षाच्या कार्यकाळात ३५ वेळा विदेशात गेले. दुसऱ्या म्हणजे २००९ ते २०१४च्या कार्यकाळात ३८ वेळा गेले. परंतु नरेंद्र मोदी त्यांच्या २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळात ४९ वेळा विदेशात गेले आहेत.
  • डॉ. मनमोहन सिंह यांनी पहिल्या पाच वर्षात २८ देशांना आणि दुसऱ्या पाच वर्षात ३५ देशांना भेटी दिल्या, तेच नरेंद्र मोदी यांनी पाचच वर्षात ५९ देशांना भेटी दिल्या.
  • विदेशातील मुक्कामाचे दिवस पाहिले तर डॉ. सिंह यांनी पहिल्या पाच वर्षात १४७, दुसऱ्या पाच वर्षात १५८ दिवस विदेशात घालवले होते. याउलट पंतप्रधान मोदींनी पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात १८६ दिवस विदेशात घालवले आहेत.

याचाच अर्थ अमित शहा यांच्या दाव्यात अजिबातच तथ्य नाही. नरेंद्र मोदी डॉ. मनमोहन सिंह यांच्या तुलनेत परदेश वाऱ्या करण्यात प्रत्येक आकडेवारीत आघाडीवरच आहेत. (fake news against Dr Manmohan Singh)

२. दावा:

डॉ. मनमोहन सिंह म्हणतायेत मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ सरकारे फार चांगले आहेत – अमित मालवीया

भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर डॉ. मनमोहन सिंह यांची व्हिडीओ क्लिप शेअर केली होती. ज्यामध्ये ते म्हणतायेत “The Governments of Madhya Pradesh and Chhattisgarh were very good.”

याच ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘राहुल गांधी यांच्या सततच्या वक्तव्यांच्या विरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी वक्तव्य करत मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ शासनाला ‘Very Good’ म्हंटले आहे. कॉंग्रेस अध्यक्षांच्या गेल्या काही दिवसांच्या वक्तव्यांवर त्यांनी अक्षरशः पाणी फेरले .’

हाच व्हिडीओ भाजपचा सोशल मिडिया वरील महिला मोर्चा सांभाळणाऱ्या प्रीती गांधी यांनीही शेअर केला होता. (fake news against Dr Manmohan Singh)

वस्तुस्थिती:

पडताळणीअंती असे लक्षात आले की सदर व्हिडीओ क्लिप २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील आहे. यामध्ये पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सिंह जे बोलले त्या वक्तव्यातील एक वाक्य तोडून भाजप नेत्यांनी आपले दावे रेटले आहेत. (fake news against Dr Manmohan Singh)

काय आहे डॉ. सिंह यांचं पूर्ण वाक्य?

“My relationships with the government of Madhya Pradesh, the government of Chhattisgarh were very good. We never discriminated against BJP-ruled states.” 

म्हणजेच ‘माझे मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ सरकारांसोबत खूप चांगले (Very Good) संबंध होते. आम्ही कधीच भाजप शासित राज्यांशी दुजाभाव केला नाही.’

३. दावा:

डॉ. मनमोहन सिंह २००३ साली CAAचे समर्थन करत होते. – अमित मालवीया

नागरी सुधारणा विधेयकावरून झालेल्या गदारोळात कॉंग्रेस नेते आपली भूमिका बदलत आहेत, स्वतःच्याच वक्तव्यांवर घुमजाव करत आहेत. काही वर्षांपूर्वी समर्थन देणारे आता विरोधात आंदोलने करतायेत असे भाजप नेते दावा करत होते. याच दाव्याला पुरावा म्हणून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीया यांनी राज्यसभेतील डॉ. मनमोहन सिंह यांचे वक्तव्य ट्विट केले होते.

Amit Malviya archived tweet to claim Manmohan Singh was in favour of CAA checkpost marathi
Source: Archive Tweet

वस्तुस्थिती:

हे अगदीच खरे आहे की डॉ. मनमोहन सिंह २००३मध्ये नागरी सुधारणा विधेयकाच्या समर्थनात होते. राज्यसभेत त्यांनी ”आपल्या देशाच्या फाळणीनंतर बांगलादेश सारख्या देशातील अल्पसंख्यांकांना छळाला सामोरे जावे लागले आहे आणि हे आपले नैतिक कर्तव्य आहे की जर परिस्थितीमुळे या दुर्दैवी लोकांना आपल्या देशात आश्रय घेण्यास भाग पडत असेल तर या दुर्दैवी व्यक्तींना नागरिकत्व देण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. अधिक उदारमतवादी व्हा!’ असे वक्तव्य केले होते.

परंतु या वक्तव्यात त्यांनी कुठेही धर्माचा उल्लेख केला नव्हता, जो आताच्या २०१९ मधील ‘नागरी सुधारणा विधेयकाच्या’ विरोधाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आताच्या कायद्यानुसार बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून आलेल्या मुस्लिमेतर लोकांनाच नागरिकत्व देण्याच्या पक्षात आहे. असा धर्मावर आधारित कायदा कशासाठी म्हणून कॉंग्रेस विरोध करत आहे, नागरिकत्व देण्याला नव्हे.

अमित मालविया यांनी डॉ. मनमोहन सिंह यांचे जुने वक्तव्य डकवून जनतेची दिशाभूल करत आपला प्रोपोगंडा रेटण्याचा प्रयत्न केलाय. (fake news against Dr Manmohan Singh)

४. दावा:

७५ वर्षीय डॉ. मनमोहन सिंह ७१ वर्षाच्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाया पडत आहेत.

२०१९ मध्ये सोशल मीडियात एक फोटो सातत्याने व्हायरल केला जात होता आणि भर सभेत डॉ. मनमोहन सिंह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या पाया पडत असल्याचे दावे केले जात होते. ‘फिर एक बार मोदी सरकार’ या फेसबुक पेजवरून शेअर झालेल्या ईमेजवर ‘भारताचे महान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह’ असे कॅप्शन होते. ही पोस्ट आजवर तब्बल १२००० लोकांनी शेअर केलीय.

चाटो चाटो चाटो यही तुम्हारी औकात है कांग्रेसी चमचो

Posted by फिर एक बार मोदी सरकार on Thursday, 28 June 2018

अर्काईव्ह लिंक

हाच फोटो विविध टेक्स्ट ग्राफिक्स सह व्हायरल होत होता.

अर्काईव्ह लिंक

वस्तुस्थिती:

व्हायरल इमेजवर इमेज स्टॉक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेबसाईट ‘गेट्टी इमेज’चा वॉटरमार्क दिसल्यानंतर आम्ही या साईटवर जाऊन मूळ इमेजची शोधाशोध केली तेव्हा सदर फोटो ‘इंडियन युथ कॉंग्रेस कन्व्हेन्शन’मधील असल्याचे समजले. त्यावरील कॅप्शननुसार सोनिया गांधींच्या पाया पडणारी व्यक्ती कॉंग्रेसचे कुणी प्रतिनिधी असल्याचे लिहिले आहे. यात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नावाचा उल्लेख नाही.

Source: Getty Image

तरीही पुन्हा खात्री करण्यासाठी गेट्टी इमेजवरच या कार्यक्रमाचे इतर फोटोज जेव्हा आम्ही तपासले तेव्हा असे लक्षात आले की डॉ. सिंह यांनी त्यादिवशी केसरी नव्हे तर निळी पगडी (तुर्बान) गुंडाळली होती. म्हणजेच व्हायरल फोटोतील व्यक्ती नक्कीच डॉ. मनमोहन सिंह नव्हते. (fake news against Dr Manmohan Singh)

Source: Getty Image
Source: Getty Image

५. दावा:

मनमोहन सिंह पंतप्रधान होते पण सूत्र सोनिया गांधींच्या हातात होते सांगणारा व्हिडीओ!

डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सर्व सूत्रे सोनिया गांधी यांच्याच हाती होते असे सुचवण्यासाठी २०१८-१९ मध्ये ३६ सेकंदाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. इतका की ‘मोदीनामा’ या फेसबुक पेजवरून पोस्ट झालेल्या व्हिडीओला तब्बल १ लाख ६१ हजार ६२३ लोकांनी शेअर केले होते. नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली.

Screenshot of FB post used in the story of Boom live
Source: Boom Live/ Facebook

सदर व्हिडीओ फेसबुकवर आजही अनेकांच्या वॉलवर उपलब्ध आहे.

जिनको वहम था कि मनमोहन सिंह प्रधानमंत्री थे, वह यह वीडियो दो-चार बार आंखें खोलकर देख लें, सारा वहम दूर हो जाएगा!

Posted by वीर हिन्दू भारतीय on Thursday, 14 June 2018

अर्काइव्ह लिंक

वस्तुस्थिती:

सदर व्हिडिओ श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंह सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भेटीला दिल्ली येथे आले होते त्या प्रसंगाचा आहे. या भेटीची बातमी ANI या वृत्तसंस्थेने दिली होती. बातमीच्या ट्विटनुसार हा प्रसंग २६ एप्रिल २०१७चा आहे. ज्यावेळी डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधानपदी नव्हते. म्हणूनच बातमीच्या ट्विटमध्ये डॉ. सिंह यांना ‘Former PM’ म्हणजेच ‘माजी पंतप्रधान’ असे संबोधले आहे. (fake news against Dr Manmohan Singh)

या अगोदर सुद्धा श्रीलंकेचे पंतप्रधान सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी म्हणजे २०१६ साली त्यांनी स्वतः ट्विट करून भेटीत चर्चा झालेल्या मुद्द्यांबद्दल ट्विट करून माहिती दिली होती. यावेळी सुद्धा मनमोहन सिंह पंतप्रधानपदी नव्हते.

याचाच अर्थ असा की मूळ व्हिडीओला शेअर करत होत असलेले व्हायरल दावे दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन आहेत.

या सर्व फेक दाव्यांची झाडाझडती घेण्यासाठी अल्ट न्यूज, बूम लाइव्ह, द लॉजिकल इंडियन या पोर्टल्सची बरीच मदत झाली. त्यांचे आभार!

हेही वाचा:

नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पेरलेल्या महत्वाच्या फेक न्यूजची पोलखोल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा