Press "Enter" to skip to content

जेटची कार्यक्षमता वाढावी म्हणून पाकिस्तानी पायलटने कॉकपिटमध्ये लघवी केली?

‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल करत दावा केला जातोय की ‘जेटची कार्यक्षमता वाढावी म्हणून पाकिस्तानी पायलटने कॉकपिटमध्ये लघवी केल्याचे आढळले.’ हे दावे पाकिस्तानी हवाई दलाची टर उडवण्यासाठी सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. (pilot urinated in cockpit)

Advertisement

‘PAF F-16 या जेटच्या पायलटने कार्यक्षमता वाढावी म्हणून विमानाच्या कॉकपिटमध्ये लघवी केल्याचे आढळले. चौकशीअंती त्याने असे सांगितले की अल्लाहने त्याच्या स्वप्नात येऊन हा उपाय करण्यास सांगितले होते.’ अशा आशयाची हेडलाईन आणि खाली लढाऊ विमानाचा फोटो असणारी पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ची बातमी व्हायरल होतेय.

काहीच्या काही

Posted by Sarang S. Kaanade on Monday, 4 January 2021

अर्काइव्ह लिंक

(pilot urinated in cockpit) फेसबुकवर या स्क्रिनशॉटच्या आधारे अनेक जन अशा प्रकारच्या खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट्स करत आहेत.

FB posts claiming Pakistani pilot pissed in cockpit
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्ट्सची पडताळणी करताना सर्वात आधी व्हायरल फोटोची सत्यता तपासून पाहिली. सदर स्क्रिनशॉटवर १० जून २०२० अशी तारीख आहे.

त्याचाच आधार घेत आम्ही ‘डॉन’ वृत्तपत्रात १० जून २०२० रोजी अशी काही बातमी प्रकाशित झाली होती का हे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यादिवशीची एकही बातमी सदर व्हायरल हेडलाईनशी मिळतीजुळती नव्हती.

याहून मजेशीर बाब म्हणजे ‘डॉन’ हे पाकिस्तानच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचले जाणारे वृत्तपत्र आहे. त्याच्या बातमीदार, उपसंपादक आणि संपादक या मंडळींना ‘कार्यक्षमता’ म्हणजेच ‘efficiency’ या शब्दाचे योग्य स्पेलिंग येत नसेल याची शक्यता फारच कमी आहे. कारण व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये ते चुकीचे ‘efficiancy’ असे लिहिले आहे. एवढेच नव्हे तर बातमीच्या हेडलाईनमध्ये शेवटी कधीही ‘पूर्णविराम’ देत नाहीत. या बातमीच्या शेवटी तो दिला गेलाय. तसेच वाक्याच्या मध्ये अचानकच गरज नसताना ‘pissing’ या शब्दाचे पहीले लेटर ‘P’ कॅपिटल मध्ये लिहिले आहे. अशा सर्वसाधारण व्याकरणाच्या चुका ‘डॉन’ वृत्तपत्राकडून अपेक्षित नाहीत.

कोणत्याही बातमीला ‘बायलाईन’ असते. बायलाईन म्हणजे घटनेची तारीख, ठिकाण, वार आणि फार महत्वाची वेगळी बातमी असेल तर बातमीदाराचे नाव त्यात असते. अशाप्रकारची बायलाईन येथे दिसून येत नाही.

Dawn news fake screenshot claims Pakistani pilot pissed in cockpit

या बातमीचा स्क्रिनशॉट भासवण्यासाठी वापरलेल्या विमानाचा फोटो आणि बातमीची तारीख मागे काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका फेक बातमीचा आहे. १० जून २०२० रोजी असाच एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता. त्यामध्ये दावा करण्यात आला होता की ‘PAF F-16’ हे विमान गायब झाल्याने कराचीमध्ये चिंतेचे वातावरण होते.

या बातमीस स्वतः ‘डॉन’ वृत्तपत्राने फेक घोषित करत सत्यता सांगणारी बातमी प्रकाशित केली होती.

Down declared screenshot of news is fake
Source: DOWN

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (pilot urinated in cockpit) व्हायरल पोस्ट्समध्ये वापरण्यात आलेला बातमीचा स्क्रिनशॉट फेक असल्याचे सिद्ध झाले. कुणीतरी खोडसाळपणा करत जुन्या व्हायरल फेक बातमीचा स्क्रिनशॉट एडीट करून या पद्धतीची हेडलाईन टाकलेली आहे. अशी कुठली घटना घडल्याच्या कोणत्याही वृत्तपत्रात बातम्या अस्तित्वात नाहीत.

हेही वाचा: दीपक चौरसियांकडून पेशावरच्या मदरशामध्ये बॉम्ब बनवले जात असल्याचा फेक दावा!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा