Press "Enter" to skip to content

हिंदू वस्त्यांमध्ये रासायनिक भेसळ असणारे अन्नपदार्थ विका असा ‘दारूल उलुम देवबंद’चा फतवा? वाचा सत्य!

‘हिंदू वस्त्यांमध्ये केमिकल्स मिसळून तयार केलेले अन्नपदार्थ पोहचवा, जेणेकरून या काफिरांची मुलं आजारी पडतील’ असा फतवा समस्त मुस्लीम समुदायासाठी ‘दारूल उलुम देवबंद’ने (Darul Uloom Deoband) जारी केला असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल मजकूर:

फतवा: तमाम मुसलमान भाईयोसे इल्तिजा है, हिंदू कोफिर बस्ती व गांवो, इलाकोमें कैमिकल्स मिलाकर घटिया क्वालिटी के फल, सब्जी, दुध, पनीर, आईसक्रिम आदी चीजे बेचे ताकी कोफिर जमात व इनके बच्चे भारी तादाद मे बिमारी के गिरफ्तमें आये. 
फरमान : मदरसा दारूल उलम देवबंद 

सदर मजकूर असणारे ट्विट ‘मौलाना गयुर शेख’ या ट्विटर हँडलवरून ट्विट केले गेलेय. याचाच फोटो सर्वत्र व्हायरल होतोय.

May be an image of text that says "मौलानागपूरशेखा @gayur_sheikh फतवा: तमाम मुसलमान भाईयो से इल्तिजा है हिंदू कोफिर बस्ती व गांवो, इलाको मे कैमिकल्स मिलाकर घटिया क्वालिटी के फल, सब्जी, दुध पनीर, आईसक्रीम आदि चीजे बेंचे ताकि कोफिर जमात व इनके बच्चे भारी तादाद मे बिमारी की गिरफ्त मे आऐ फरमान: दारूल उलम देवबंद Translate Tweet 9:19 PM 28 Feb 20 Twitter Web App"
Source: Facebook

फेसबुक, ट्विटर प्रमाणेच हे दावे व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक किरण साळुंखे यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

मदरसा दारुल उलूम देवबंद द्वारा हिन्दू बस्तियों में केमिकल युक्त खाने-पीने की चीजे बेचने का फतवा जारी किया गया
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांचे मूळ म्हणजे ‘मौलाना गयुर शेख’ हे ट्विटर अकाऊंट शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते अकाऊंट सध्या अस्तित्वात नाही, कदाचित ट्विटरने त्यावर कारवाई केली असण्याची शक्यता आहे.

Maulana Gayur Sheikh twitter handle is not active
Source: Twitter

व्हायरल स्क्रिनशॉटवर ट्विटची तारीख दिसतेय, २८ फेब्रुवारी २०२०. या काळात ‘ दारूल उलुम देवबंद’कडून असा काही फतवा जारी झाल्याच्या काही बातमी आहेत का? हे तपासत असताना आम्हाला अमर उजाला आणि झी न्यूजच्या बातम्या सापडल्या. या बातम्यानुसार ‘ दारूल उलुम देवबंद’ने सदर फतवा फेक असल्याचे स्पष्ट करत त्यांचे उलेमा मोहतमिम समेत दिगर यांनी सहारनपूर पोलिसांकडे ‘मौलाना गयुर शेख’ या ट्विटर अकाऊंटमागे जो कुणी असेल त्यावर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Darul ulum devband viral fatwa is fake news on amar ujala
Source: Amar Ujala

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की हिंदू वस्त्यांमध्ये रसायनयुक्त अन्नपदार्थ विकून हिंदूंना व त्यांच्या मुलांना आजारी पाडण्याचा ‘दारूल उलुम देवबंद’चा व्हायरल फतवा फेक आहे. ज्या ‘मौलाना गयुर शेख’या ट्विटर हँडलवरून सदर फतवा ट्विट केला गेलाय त्यावर कारवाई करण्याची मागणी स्वतः ‘दारूल उलुम’ने केली आहे.

हेही वाचा: लता मंगेशकरांच्या पार्थिव देहावर शाहरुख खान थुंकला? वाचा व्हायरल दाव्यांचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

×

Powered by WhatsApp Chat

× न्यूज अपडेट्स मिळवा