Press "Enter" to skip to content

हिंदुत्ववादी संघटनांचा छत्तीसगडमधील मशिदीत घुसून धुडगूस? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये भगव्या कपड्यांमधील अनेकजण मशिदीसमोर जमा झालेले दिसताहेत. व्हिडिओसोबत ‘जय श्रीराम’ची नारेबाजी आणि डीजेवरील गाणे देखील ऐकायला मिळतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ काँग्रेस शासित छत्तीसगडमधील असून तेथील हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदीसमोर धुडगूस घातला आहे.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता दैनिक भास्करची 2 एप्रिल रोजीची बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार व्हिडीओ छत्तीसगडमधील बिलासपूर येथीलच आहे. मात्र या बातमीमध्ये कुठेही हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदीसमोर कसल्याही प्रकारचा गोंधळ घातल्याचा उल्लेख नाही.

व्हिडीओ बिलासपूरमधील लूथरा शरीफ दर्ग्याजवळचा आहे. बिलासपूरमध्ये पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा हा व्हिडीओ आहे. या मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार किंवा गोंधळ झाला नव्हता.

लुथरा शरीफ दर्गा समितीचे माजी प्रवक्ते रियाझ अश्रफी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जात असलेले दावे पूर्णतः चुकीचे आहेत. सम्राट विक्रम आदित्य समितीने 2 एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त मिरवणूक काढली होती. कौली या गावातून निघालेली ही मिरवणूक खमारिया मार्गे लुथरा शरीफ दर्ग्यावर पोहोचली. पंचायत प्रतिनिधीने लुथरा शरीफ दर्ग्यावर मिरवणुकीच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्हायरल व्हिडीओ याच कार्यक्रमादरम्यानचा आहे.

अश्रफी पुढे सांगतात की लुथरा शरीफ दर्ग्यात सर्वधर्मीय लोक येतात. अशा प्रकारच्या खोट्या दाव्यांच्या माध्यमातून परस्पर बंधुभाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण सर्वानीच या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

सिपत पोलिस ठाण्याचे प्रभारी राजकुमार सौरी यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी मिरववणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. राजकुमार सौरी सांगतात की ना अशा प्रकारची काही घटना घडली आहे, ना आम्हाला यासंदर्भात कुठली तक्रार मिळाली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की छत्तीसगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडमधीलच बिलासपूर येथील हिंदू नववर्षानिमित्तच्या मिरवणुकीचा आहे. या मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

हेही वाचा- मशिदीवर भगवा फडकवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ राजस्थानमधील नाही! मग कुठला? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा