Press "Enter" to skip to content

दलवीर भंडारींची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड झालेली नाही, व्हायरल दावे फेक!

‘पंतप्रधान मोदींची चाणक्य कूटनीति. जागतिक मंचावर ब्रिटनचा पराभव. न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली.’ अशा प्रकारचा मजकूर असणारे दावे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

Advertisement

व्हायरल दावा:

 ब्रेकिंग न्यूज - 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची निवड झाली आहे!
 
भारताचा मोठा विजय!!! पंतप्रधान मोदींची चाणक्य कूटनीति. जागतिक मंचावर ब्रिटनचा पराभव. पंतप्रधान मोदीजींनी जगभरात कसे संबंध विकसित केले याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे. भारताचे न्यायमूर्ती दलवीर सिंग यांना 193 मतांपैकी 183 मते मिळाली (प्रत्येक देशातून एक) आणि त्यांनी ब्रिटनच्या न्यायमूर्ती ख्रिस्तोफर ग्रीनवुडचा पराभव केला. ब्रिटनची या पदावरील 71 वर्षांची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली.
 हे साध्य करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय गेल्या ६ महिन्यांपासून प्रयत्नशील आहे! सर्व 193 देशांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना सहज जिंकण्याची खात्री असलेल्या ब्रिटीश उमेदवाराबाबत भारताची भूमिका समजावून सांगणे हे फार कठीण काम होते. मतदानाच्या 11 फेऱ्यांमध्ये, न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांना महासभेत 193 पैकी 183 मते मिळाली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 15 पैकी सर्व 15 सदस्य.
 न्यायमूर्ती दलवीर भंडारी हे 9 वर्षांच्या कार्यकाळासाठी हे पद सांभाळतील. भारताला मत देणारे हे 183 देश "आंधळे मोदीभक्त" आहेत का! आपल्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर आपले पंतप्रधान मोदीजींनी जगभरातील देशांशी किती विनम्र, आदरयुक्त आणि उत्तम संबंध निर्माण केले याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
 ️विनंती - आवडल्यास तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा
 जय हिंद-जय भारत.

फेसबुकवरही हे दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Dalveer Bhandari cheif Justice viral claims on facebook
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संदेश बालगुडे, जीजाभाऊ आणि राजेंद्र काळे यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी कीवर्ड सर्च केले तेव्हा आम्हाला याविषयीची एकही ताजी बातमी सापडली नाही. २०१७ सालच्या काही बातम्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे की दलवीर भंडारी (Dalveer Bhandari) यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा निवड झाली आहे. या बातम्यांत कुठेही दलवीर भंडारी यांची मुख्य न्यायाधीशपदी निवड झाल्याचा उल्लेख नाही.

द क्विंटमध्ये २२ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित बातमीनुसार ब्रिटीश उमेदवार ख्रिस्तोफर ग्रीनवुड (Christopher Greenwood) यांनी पाठींबा दिल्यानंतर भंडारी विजयी झाले. खरे तर महासभा भंडारी यांच्याकडे होती, ज्याला ब्रिटन आव्हान देऊ शकले नाही.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात ‘मुख्य न्यायमूर्ती’ असे कुठले पदच नाही.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायमूर्ती असे कोणतेही पद नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून १५ सदस्य असतात आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात.

सद्यस्थितीत या न्यायाधीशांच्या सदस्यीय समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद अमेरिकेचे जॉन ई. डोनोघ्यू आणि रशियाचे किरिल गेव्होर्जियन यांच्याकडे आहे, भंडारी यांच्याकडे नाही.

पंतप्रधान मोदींचा या सर्वाशी काहीएक संबंध नाही

दलवीर भंडारी यांची २७ एप्रिल २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १५ सदस्य न्यायाधीशांपैकी एक म्हणून निवड झाली. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांची ९ वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली. ही माहिती न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यकाळ २०१४ साली चालू झाला. भंडारी हे २०१२ साली न्यायाधीशांच्या सदस्यीय समितीत निवडले गेले. याचाच अर्थ दलवीर भंडारी यांच्या न्यायाधीशपदीच्या निवडीशी पंतप्रधान मोदींचा संबध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘पंतप्रधान मोदींची चाणक्य कूटनीति. न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली’ असे मजकूर असणारे दावे फेक आहेत.

आंतरराष्ट्रीय नायालयात मुख्य न्यायाधीश असे काही पदच अस्तित्वात नाही. तसेच दलवीर भंडारी १५ न्यायाधीशांच्या समितीपैकी एक असून २०१२ पासून ते त्या पदावर आहेत, तर नरेंद्र मोदींनी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे २०१४ साली हाती घेतली.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नागरिकांना विमानाच्या तिकिटात ५०% सूट जाहीर केली? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा