Press "Enter" to skip to content

दैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत!

आयकर विभागाने २२ जुलै रोजी भास्कर माध्यम समूहाच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर छापे टाकले. केंद्र सरकारने आकसातून ही कारवाई केली असून भास्कर समूह स्वतंत्र्यरीत्या काम करत राहील, अशी प्रतिक्रिया या कारवाईनंतर भास्कर समूहाकडून देण्यात आली. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल झालं. दावा करण्यात आला की भास्कर समूहाने उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात मोहीम उघडताना ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’

Advertisement
चे होर्डिंग्ज लावले आहेत.

Source: Facebook

ट्विटरवर देखील अनेक युजर्सकडून हाच दावा केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • व्हायरल होर्डिंग व्यवस्थित निरखून  बघितलं असता होर्डिंगच्या खालच्या बाजूला डावीकडे ‘योगी झूठा है’ हा लोगो बघायला मिळतोय.
  • याआधारे शोध घेतला असता ‘योगी झूठा है’ नावाच्या फेसबुक पेजवरून २२ जुलै रोजी हे होर्डिंग शेअर केलं गेलं असल्याचं आढळून आलं. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “दमनकारी सरकार’ ने ‘दैनिक भाष्कर’ की आवाज़ दबाने की कोशिश की, फिर जो दैनिक भाष्कर करना चाहेगा वह आपके सामने है”

'दमनकारी सरकार' ने 'दैनिक भाष्कर' की आवाज़ दबाने की कोशिश की, फिर जो दैनिक भाष्कर करना चाहेगा वह आपके सामने है🤣🤣

Posted by Yogi Jhootha Hai on Thursday, 22 July 2021
  • ट्विटरवर ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’ या लाईनसह शोध घेतला असता @RoflGandhi_ या ट्विटर हॅण्डलवरून २२ जुलै रोजी करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये भास्करचं २०१७ वर्षीचं होर्डिंग शेअर करण्यात आलं होतं. यावर ‘ना दलितों की रानी, ना यादव की कहानी’ असं लिहिलेलं बघायला मिळतंय. कॅप्शनमध्ये विचारण्यात आलं होतं की आता दैनिक भास्कर लखनऊमध्ये ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावेल काय?
  • यावरून स्पष्ट होतं की @RoflGandhi_या अकाउंटवरून ट्विट करण्यात आलेल्या ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे या लाईनच्या आधारे ‘योगी झूठा है’ या फेसबुक पेजच्या ऍडमिनने एक एडिटेड होर्डिंग बनवलं.
  • हे होर्डिंग फेसबुकवर अपलोड करताना कुठेही ‘योगी झूठा है’ पेजने हे भास्करचे अधिकृत होर्डिंग असल्याचा दावा केला नाही. आयकर विभागाच्या कारवाईनंतर आता भास्करला अशा प्रकारचे होर्डिंग लावायला आवडतील असं केवळ त्यात म्हंटलंय.
  • व्हॉट्सऍपवर तर स्वतः दैनिक भास्करने या होर्डिंगचा फोटो ट्विट केल्याचं भासवत एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय.
dainik bhaskar fake tweet
Source: Whatsapp
  • परंतु बारकाईने पाहिल्यास ट्विटर हँडल @ErDiwakarDas या नावाचे आहे. दैनिक भास्करचे अधिकृत ट्विटर अकाऊंट @DainikBhaskar या हँडलचे आहे. तसेच त्यास ‘ब्ल्यू टीक’ देऊन ट्विटरने व्हेरीफाय केल्याचेही दिसत आहे.
Dainik Bhaskar verified tweeter handle

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की दैनिक भासकरने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत. सोशल मीडियावरील व्हायरल होर्डिंग्स एडिटेड आहेत. गंमत म्हणून बनवलेलं हे होर्डिंग आता खरं असल्याचं समजून अनेकांकडून शेअर केलं जातंय

हेही वाचा- राहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार!  

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा