Press "Enter" to skip to content

‘सायकल गर्ल’ ज्योती पासवान सुखरूप, हत्या आणि बलात्काराचे दावे चुकीचे !

मे महिन्यात आपल्या वडलांना घेऊन गुरुग्राम ते बिहार असा १२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करणारी बिहारमधील ज्योती पासवान (jyoti paswan) चर्चेत आली होती. अमेरिकन राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इवांका ट्रंप यांनी त्यावेळी ट्वीटच्या माध्यमातून  ज्योतीचं कौतुक केलं होतं.

तिच्या या थक्क करणाऱ्या प्रवासावर चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याच्या बातम्या देखील गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांमध्ये आहेत.  

सध्या मात्र सोशल मिडीयावर तिच्यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जाताहेत. अर्जुन मिश्रा नामक व्यक्तीने ज्योतीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा दावा सोशल मिडियावर केला जातोय.

Advertisement

‘सायकल गर्ल’च्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

पडताळणी

‘चेकपोस्ट मराठी’ने सोशल मिडीयावर व्हायरल होत चाललेल्या दाव्यांची गुगल सर्चच्या मदतीने पडताळणी केली, त्यावेळी आम्हाला दैनिक भास्करची एक बातमी सापडली.

भास्करच्या बातमीनुसार दरभंगा येथे ज्योती पासवान नावाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे, परंतु ती सायकल गर्ल ज्योती (jyoti paswan) नाही. सायकल गर्ल ज्योती पासवानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे दावे फेक आहेत.

शिवाय सोशल मिडीयावर ही अफवा पसरविणाऱ्या शाहीन स्वैगर ‘पोलिटिकल पोपट’ विरोधात कमतौल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकारी बाबुराम यांनीच पत्रकारपरिषदेत ही माहिती दिल्याचं भास्करच्या बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्यानंतर आम्हाला ‘दरभंगा भास्कर’मध्येच ४ जुलै रोजी प्रकाशित दुसरी एक बातमी वाचायला मिळाली. या बातमीत प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली.  

या बातमीनुसार दरभंगा मधील पतोर ओपी भागात रिटायर्ड जवान अर्जुन मिश्रा यांच्या आंब्याच्या बागेत एका मुलीचा मृतदेह मिळाला होता. सुरुवातीला ज्योती पासवान नामक मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मात्र पोलिसांनी बलात्काराचे दावे निराधार सांगितले, शिवाय पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार ज्योतीचा मृत्यू विजेचा करंट लागून झाला असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय.

वस्तुस्थिती

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सायकल गर्ल ज्योती पासवान सुखरूप आहे. तिच्यासंदर्भात पसरविण्यात येत असलेल्या बलात्कार आणि हत्येच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

बिहारमधील दरभंगा येथीलच ज्योती पासवान नामक चिमुरडीचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी देखील बलात्कार झाल्याचे दावे पोलिसांनी  पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे नाकारले आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास  सुरु आहे.

हे ही वाचा- योगी आदित्यनाथ यांच्यासोबत कानपुर शूटआउटच्या गँगस्टर विकास दुबेचा फोटो?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा