Press "Enter" to skip to content

पुण्याच्या ससून रुग्णालयातील रुग्णांची गर्दी म्हणत व्हायरल होतोय बिहारमधील व्हिडीओ!

पुण्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातील, ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) येथे रुग्णांची तोबा गर्दी असल्याचे दाखवत एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना या परिस्थितीसाठी जबाबदार धरत टॅग केले जात आहे.

This is the current situation in
Pune at Sasoon Hospital.
Covid 19.. testing..@mohol_murlidhar ससुन हॉस्पिटलमध्ये कॉविड-19 चा टेस्ट करण्यासाठी गर्दी किती आहे..पहावे 😢 नियोजन शुन्य “राज्य सरकार फक्त आश्वासन,नको. @CMOMaharashtra नागरिकांचे हाल होत आहे लक्ष द्यावे
विनंती करतो..’

असे कॅप्शन लिहीत ‘सलीम बाबा सय्यद पुणेकर’ या ट्विटर हँडल वरून सदर व्हिडीओ शेअर झालाय.

तोच व्हिडीओ शेअर करत अथर्व मोहरीर या ट्विटर युजरने लिहिलंय:

‘This is video ससून हॉस्पिटल पुणे
( OPD )
गर्दी पहा आणि घरीच रहा. Bhoomi poojan is yet not done & this is the situiations of hospitals in Maharashtra Mostly , Only speaking an having concerns won’t make the situiation better .’

या कॅप्शनला शरद पवार यांच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावरील प्रतिक्रियेची पार्श्वभूमी आहे. मोहरीर असं लिहित आहेत की ‘भूमी पूजन अजून व्हायचं आहे, ही आहे महाराष्ट्रातील बहुतांश हॉस्पिटल्सची अवस्था. आम्हाला नागरिकांची काळजी आहे असे फक्त म्हणून परिस्थिती सुधारणार नाहीये.’

अर्काइव्ह

‘ससून Positive रुग्णांची गर्दी पहा, बेडच उपलब्ध नाहीत… काळजी घ्या सुरक्षित रहा!’ असे लिहून तो व्हिडीओ फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होताना दिसतोय.

ससून हॉस्पिटल POSITIVE रुग्णाची गर्दी Stay home stay safe 🙏🙏

Posted by Amol Aiwale on Wednesday, 22 July 2020
crowded hospital video shared in whatsapp with the caption of Sasoon hospital
Source: Whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी सादर व्हिडीओ व्यवस्थित पाहिला, ऐकला. यात कुठेही ससून हॉस्पिटलचा (Sassoon Hospital) उल्लेख आढळला नाही.

कुणातरी ‘मॅडम’ला ही एवढी भयंकर गर्दी झालेली असून ती रुग्णांच्या तर आहेच पण डॉक्टर आणि इतर स्टाफ साठी सुद्धा धोक्याची असल्याचे सांगण्यासाठी रेकॉर्ड केल्याचे दिसत आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचे नाव डॉ. राणा सिंह असल्याचे लक्षात आले.

त्या अनुषंगाने विविध कीवर्ड्स वापरून आम्ही जेव्हा सर्च करू लागलो तेव्हा हाच व्हिडीओ दिल्ली, बंगळूरू, एम्स पटना अशा विविध ठिकाणचा म्हणून व्हायरल होत असल्याचे समजले.

फेसबुकवर सुद्धा आम्ही सर्च केले तेव्हा ‘बिहार’ नावाच्या पेजने शेअर केलेला व्हिडीओ आम्हाला सापडला. यात कॅप्शन मध्ये त्यांनी ‘ये किस राज्य के किस अस्पताल का वीडियो है हमें नही पता, किसी को जानकारी हो तो बताएं। भीड़ तो देखिए। Edit: कमेंट में डॉ. राणा सिंह ने खुद बताया है कि ये पटना का महावीर कैंसर संस्थान है।’ असे लिहिले आहे.

ये किस राज्य के किस अस्पताल का वीडियो है हमें नही पता, किसी को जानकारी हो तो बताएं। भीड़ तो देखिए। Edit: कमेंट में डॉ. राणा सिंह ने खुद बताया है कि ये पटना का महावीर कैंसर संस्थान है।

Posted by Bihar on Thursday, 16 July 2020

कॅप्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही कमेंट तपासून पाहिल्या, त्यात डॉ. राणा सिंह यांच्या कमेंट्स आम्हाला सापडल्या.

Dr Rana Singh comments to tell he only recorded video

यात त्यांनी हा व्हिडीओ १५ जुलै २०२० रोजी स्वतः रेकॉर्ड केला असल्याचे सांगितले आहे. महावीर कॅन्सर संस्थान, पटना येथे ते मेडिकल ऑफिसर असून कोरोना स्क्रीनिंग साठी गर्दी केलेल्या लोकांचा तो व्हिडीओ आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

क्रॉसचेक करण्यासाठी आम्ही महावीर कॅन्सर संस्थान, पटनाच्या वेबसाईटवर गेलो. तिथे डॉ. राणा सिंह यांचे नाव आम्हाला निवासी डॉक्टरांच्या यादीत मिळाले.

Mahavir cancer institute Patna website

आपल्या माहितीस्तव:

आम्ही जेव्हा या व्हायरल व्हिडीओची पडताळणी करत होतो तेव्हा आणखी एक बातमी हाती आली. बंगळूरूमधील व्हिक्टोरिया हॉस्पिटलचा हा व्हिडीओ असल्याचे म्हणत व्हायरल करून सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास सिटी क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले आहे. अशी माहिती आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी ट्विट केलीय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओ पुण्यातील ससून हॉस्पिटलचा (Sassoon Hospital) नसून तो बिहारच्या पटना येथील महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर येथील असल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनाचा संबंध असणाऱ्या कुठल्याही व्हायरल गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ‘चेकपोस्ट मराठी’कडे त्याची पडताळणी करा आणि मगच हवं तर फॉरवर्ड करा. (आमचा व्हॉट्सऍप नंबर: 9172011480)

हेही वाचा: कोरोना पेशंटचे अवयव गायब केले जात असल्याचा व्हायरल दावा फेक !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा