Press "Enter" to skip to content

मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांच्या नमस्काराला उत्तर न देता चेहरा फिरवल्याचा व्हिडीओ एडीटेड!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या निरोप समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जाणीवपूर्वक कोविंद यांच्या नमस्काराला उत्तर दिले नाही. राष्ट्रपती अभिवादनासाठी हात जोडून समोर उभे होते, परंतु मोदींनी चेहरा फिरवला. अशी दृश्ये असणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

कॉंग्रेस, आप या विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेक नागरिकांनी सोशल मीडियात हा व्हिडीओ शेअर करत मोदींविषयी जाहीर नाराजी प्रदर्शित केली आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीसाठी सदर प्रसंगाचा मूळ संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी शोधाशोध केली असता ‘संसद टीव्ही’चा युट्युब व्हिडीओ आम्हाला मिळाला.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) आपल्या आसनावरून खाली येऊन संसद सदस्यांना अभिवादन करत चालू लागले. सदस्यांनीही हात जोडून अभिवादन केले. राष्ट्रपती चालत मोदींजवळ येत असतानाच मोदींनीही स्मित हास्य करत हात जोडून अभिवादनास सुरुवात केली. परंतु नेमके राष्ट्रपती समोर येण्याच्यावेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे नजर वळवली आणि राष्ट्रपती त्यांच्या समोर येऊन हात जोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.

व्हायरल क्लिपमध्ये जाणीवपूर्वक मोदींनी स्मितहास्य करत हात जोडून अभिवादन केल्याचा भाग कट करून चेहरा वळविल्यापासूनच्या कृतीपासूनचा व्हिडीओ ठेवला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिवादनास उत्तर न देता जाणीवपूर्वक चेहरा वळविल्याची दृश्ये दाखवणारा व्हायरल व्हिडीओ अर्धवट आणि दिशाभूल करणारा आहे. मूळ व्हिडीओमध्ये मोदींनी स्मित हास्य करत हात जोडून अभिवादन केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: कोरोनाची लस घेतलेल्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५००० रुपये बक्षिस रक्कम? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा