Press "Enter" to skip to content

‘त्या’ किड्यास हाताने माराल तर शरीराची होईल भयानक अवस्था? वाचा व्हायरल मेसेजचे सत्य!

सोशल मीडियात एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. पाठीवर अनेक काटे असल्यासारखे दिसणारा किडा त्यामध्ये दिसतोय. या किड्यास हाताने मारायचा प्रयत्न केल्यास कदापी इलाज होऊ न शकणारा व्हायरस शरीरात घुसेल आणि संपूर्ण शरीराची फोटोत दाखवल्याप्रमाणे भयानक अवस्था होऊन जाईल, असे सांगितले जातेय.

Advertisement

व्हायरल मेसेजचा मजकूर:

'अत्यन्त महत्वपुर्ण सूचना सावधान
इस कीड़े को गौर से देखें - इसे हाथ से छूने या मारने की ग़लती ना करें यदि ऐसा किया तो वायरस बॉडी मे आ जायेंगे,ये सेकेंडों मे पूरी बाँडी मे फैल जाता है जो लाइलाज है।
यह भारत मे पहली बार देखने को मिला है ।
इस कीडे को देखने पर नंगे हाथों से स्पर्श ना करें क्योंकि इसे छूने से जहर एक मिनट में सारे शरीर में फैल जाता है और इसका प्रभाव दिखाई देने लगता है। हाथ की हालत फोटो में दिखाई पड़ रही है। यह सबसे पहले भारत में दिखाई पडा है। अपने मित्रों को अधिक से अधिक संख्या में इसकी सूचना देने का प्रयास कीजिएगा। फोटो लगा रहा हूँ। जनहित मे जारी
सौजन्य - डाँ.विनोद कालरा, जालन्धर'
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे आणि पुरुषोत्तम शर्मा यांनी या दाव्यांचे स्क्रिनशॉट व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करताना सर्वात आधी त्यातील मजकुरातील माहितीच्या आधारे गुगल सर्च केले. यातून असे लक्षात आले की हे दावे २०१६ सालापासून व्हायरल होताहेत.

या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही त्यात असणाऱ्या फोटोजना गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले असता सत्य माहिती समोर आली.

१. फोटोतील किड्याचे नाव काय आणि तो कशाप्रकारे अपायकारक ठरू शकतो?

  • अमेरिकेच्या ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’च्या शासकीय वेबसाईटवर या किड्याविषयी विस्तृत माहिती आहे. फोटोतील किड्यास ‘जायंट वॉटर बग’ (Giant water bug)असे म्हणतात. नावाप्रमाणे हा किडा पाण्यात राहतो. कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि भारताच्या काही भागात त्याच्या प्रजाती आढळतात.
  • या किड्याची मादी नराच्या पाठीवर शंभराहून अधिक अंडी घालते. याचाच अर्थ फोटोत किड्याच्या पाठीवर काटे नसून अंडी आहेत.
Brown, flattened bug with many whitish, columnar eggs attached to its back.
Click by: Tom D. Schultz | Source: nps.gov
  • हा किडा पाण्यातून चालताना शक्यतो पायाच्या टाचेला चावतो म्हणून त्यास ‘टो-बायटर’ (toe biter)असेही म्हणतात. यातून तीव्र वेदना होऊ शकतात. पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर जर ते खुपवेळ चावत राहिले तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
  • हा किडा स्वतःच्या संरक्षणासाठी घाणेरडा वास असणारा द्रव पदार्थ स्रवतो. दक्षिण आफ्रिकेतील काही भागांत या किड्याची एक प्रजाती मिठाच्या पाण्यात शिजवून घेऊन चविष्ट पदार्थ म्हणून खाल्ली सुद्धा जाते.

२. हाताला असंख्य छिद्रे झालेल्या त्या फोटोचे सत्य काय?

  • रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आम्हाला ‘बॉडी आर्ट’ नावाच्या ट्विटर हँडलवरील २०१५ सालचे एक ट्विट मिळाले. व्हायरल दाव्यांत वापरलेल्या फोटोमधील हात, त्या मागची खिडकी आणि एकाच बोटाला असलेले नेलपेंट तंतोतंत जुळणारे आहे. हा कुठला रोग किंवा त्याचा परिणाम नसून हे बॉडी आर्ट आहे. म्हणजेच रंगांच्या आणि मेकअप सामुग्रीच्या आधारे हातावर केलेली कलाकृती आहे.
  • याच ट्विटमध्ये ‘ट्रायपोफोबिया’ असा उल्लेख आहे. हे नेमकं काय आहे? याविषयी शोधाशोध केली असता असे लक्षात आले की फोटोत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या छिद्रांकडे पाहून ज्यांना त्रास होतो, भीती वाटते त्यांस ‘ट्रायपोफोबिया‘ नावाचा मानसिक त्रास/आजार असण्याची शक्यता असते.

३. बोटांना पडलेली छिद्रे खरी की खोटी?

  • व्हायरल दाव्यात दिसणारी दोन बोटे आणि त्यांना पडलेली छिद्रे हा नेमका काय प्रकार आहे, हे तपासताना अनेकांनी त्यास ‘लॅम्प्रे’ नावाचा रोग असल्याचे संबोधले आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घेताना अनेक वेबसाईट सापडल्या ज्यांमध्ये ‘लॅम्प्रे डिसीज’ (lamprey disease) नावाचा प्रकार केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • लॅम्प्रे नावाचा एक सागरी जीव आहे. त्याच्या तोंडाकडील बाजू आणि बोटाचे फोटो फोटोशॉपच्या मदतीने एडीट करून एकत्र केले आहेत असा निर्वाळा देखील त्या साईट्सने दिला आहे.
lamprey disease is hoax
Source: medigoo

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक आहेत. दाव्यात वापरण्यात आलेल्या फोटोजचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही. फोटोतील किडा ‘जायंट वॉटर बग’ (Giant water bug)असून त्याच्या पाठीवर त्याच्या मादीचे अंडे आहेत. त्याला हात लावल्यास किंवा तो चावल्यास इतर त्रास होऊ शकतात परंतु चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्वांगाला छिद्रे वगैरे पडणे ही अफवा आहे.

हेही वाचा: मोबाईलवर खुपवेळ गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ नावाचा किडा होत असल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा