Press "Enter" to skip to content

अमित शहांच्या उत्तराखंड रॅलीत ‘काँग्रेस जिंदाबाद’ची नारेबाजी? वाचा सत्य!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. दावा केला जातोय की अमित शहांच्या रॅलीमध्ये ‘काँग्रेस जिंदाबाद’ची नारेबाजी करण्यात आली.

Advertisement

छत्तीसगढ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. अमित शहांनी काँग्रेस पार्टी असे म्हणताच रॅलीतील उपस्थितांनी जिंदाबाद म्हण्टल्याचे यात सांगण्यात आले आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही अमित शाह यांच्या उत्तराखंड रॅलीतील संपूर्ण भाषण शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला भाजपच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून 12 फेब्रुवारी 2022 रोजी अपलोड करण्यात आलेला संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ मिळाला. अमित शाह यांनी रायपूर येथील सभेत हे भाषण केले होते.

संपूर्ण भाषण व्यवस्थित ऐकले असता आमच्या असे लक्षात आले की अमित शाह यांच्या भाषणातील 11 मिनिटे 23 सेकंद ते 11 मिनिटे 30 सेकंदाचा भाग कट करण्यात आला आहे.

आपल्या भाषणात अमित शहा म्हणताहेत,

“त्यांनी (काँग्रेसने) मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही, ना त्यांना पसंतीच्या पसंतीच्या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. पण ते जाऊ द्या कारण रावतजींना (हरीश रावत) पराभवाची सवय आहे. काँग्रेसला हे माहीत आहे आणि त्यांना नवीन काही करण्याची गरज नाही. पण मित्रांनो, ही काँग्रेस पार्टी (येथे अमित शाह थांबतात आणि समोरून घोषणाबाजी सुरु होते) कधीच देवभूमीचा विकास करू शकत नाही.

अमित शाह काँग्रेस पार्टी म्हंटल्यानंतर ज्यावेळी थांबतात त्यावेळी समोरून ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली जाते. व्हिडिओमध्ये ही घोषणाबाजी ऐकायला मिळते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अमित शाह यांच्या उत्तराखंडमधील रॅली दरम्यान काँग्रेस पार्टी जिंदाबादची नारेबाजी झाल्याचे दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली असून अमित शाह यांनी काँग्रेस पार्टी म्हंटल्यानंतर रॅलीसाठी जमलेल्या जनसमुदायातून मुर्दाबादची घोषणाबाजी झाल्याचे अमित शाह यांच्या भाषणाच्या व्हिडिओत ऐकायला मिळतेय.

हेही वाचा- योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीआधी चक्क पैसे वाटले? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा