Press "Enter" to skip to content

हिंदू-मुस्लिमांचा पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसने वापरला एडिटेड फोटो!

उत्तर प्रदेश इस्ट युथ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक फोटो पोस्ट करण्यात आलाय. फोटोमध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्मीय व्यक्ती मिळून काँग्रेस पक्षाचे पोस्टर चिटकावत असल्याचे दिसताहेत. भगव्या वस्त्रातील व्यक्ती आणि डोक्यावर पारंपारिक मुस्लिम टोपी असलेला दुसरा व्यक्ती चिटकावत असलेल्या पोस्टरवर ‘यूपी में आ रही है काँग्रेस’ असे लिहिलेले बघायला मिळतेय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा फोटो शेअर करण्यात येतोय.

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘दीदी के बोलो’ या अधिकृत फेसबुक पेजवरून 2 मार्च 2021 रोजी अपलोड करण्यात आलेल्या पोस्टमध्ये हा फोटो बघायला मिळाला. मूळ फोटोमध्ये दोन्ही लोक काँग्रेस नव्हे, तर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे पोस्टर लावत असताना बघायला मिळताहेत.

source: facebook

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार नुसरत जहाँ (Nusarat Jahan) यांनी देखील 3 मार्च 2021 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो ट्विट केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप करत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या चांगल्या कार्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हंटले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेसकडून शेअर केला जात असलेला फोटो एडिटेड आहे. मूळ फोटो पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील तृणमूल काँग्रेसच्या प्रचार अभियाना दरम्यानचा आहे.

हेही वाचा- काँग्रेसकडून निवडणूक प्रचारासाठी भाजप सरकारने सुरू केलेल्या बसेसच्या फोटोचा वापर!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा