Press "Enter" to skip to content

काँग्रेसकडून निवडणूक प्रचारासाठी भाजप सरकारने सुरू केलेल्या बसेसच्या फोटोचा वापर!

हिमाचल प्रदेश काँग्रेस सेवादालाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक फोटो ट्विट करण्यात आलाय. फोटोमध्ये काही महिला रांगेत उभ्या असलेल्या गुलाबी बसेस समोर उभारून सेल्फी घेताना दिसताहेत.

Advertisement

हिमाचल प्रदेश काँग्रेस सेवादालाच्या अकाऊंटवरून हा फोटो “अब महिलाएं नहीं होंगी छेड़खानी का शिकार। महिलाओं के लिए फ्री बस सेवा लाएगी कांग्रेस सरकार। ये वादे नहीं प्रतिज्ञाएं हैं” अशा कॅप्शनसह ट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

उन्नाव काँग्रेस सेवादलाच्या अकाउंटवरून देखील हाच फोटो पोस्ट करण्यात आलाय.

पडताळणी:

फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता इंडियाडॉटकॉमच्या वेबसाईटवर 10 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो आढळून आला.

बातमीनुसार भाजपशासित आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarvanand Sonoval) यांनी महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित मोफत गुलाबी बस सेवेची सुरुवात केली. भ्रमण सारथी योजनेंतर्गत (Bhraman Sarathi Scheme) राजधानी गुवाहाटीमध्ये 25 सिटी बसेसची सुरुवात करण्यात आली आहे.

source: india.com

किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता इस्टर्न मिररच्या वेबसाईटवरील बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. बातमीमध्ये फोटो गुवाहाटीमधील खानपडा येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.

भ्रमण सारथी योजनेंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या बसेसची या दोन्हीही घटकांचा प्रवास सुलभ करण्यात मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बसेसच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेसने आपल्या प्रचार अभियानादरम्यान महिलांसाठी नवीन मोफत बसेस सुरु करण्याच्या आश्वासनासाठी वापरण्यात आलेला फोटो भाजपशासित आसाममधील भ्रमण सारथी योजनेंतर्गत महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या बसेसचा आहे.

हेही वाचा- भाजप नेत्यांनी पोस्ट केला ‘नोएडा’ विमानतळाचा म्हणून ‘बीजिंग’ विमानतळाचा फोटो, चीनने फटकारले!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा