Press "Enter" to skip to content

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता दिला २०० कोटीचा चेक? वाचा सत्य!

बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या कमाईतून काश्मिरी पंडितांनाच्या कल्याणासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी काही रक्कम दान करावी असे अनेकांनी सल्ले दिले होते. आता सोशल मीडियात एक स्क्रिनशॉट शेअर होतोय, ज्यामध्ये दावा केलाय की अग्निहोत्रींनी आपला शब्द पाळत पंतप्रधान मोदींच्या हातात २०० कोटी रुपयांचा चेक सुपूर्द करत पंतप्रधान सहाय्यता निधीस (PM Relief fund) मदत केली आहे.

Advertisement

The Kashmir Files के निर्माता विवेक अग्निहोत्री ने अपना वादा पूरा करते हुए 200 करोड़ का चेक प्रधानमंत्री राहत कोष के लिए मोदी जी को सौंपा। इस पैसे का इस्तेमाल कश्मीरी पंडितों के लिए किया जाएगा।‘ अशा कॅप्शनसह काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) , त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे असलेला एक फोटो शेअर केला जातोय.

ट्विटर, फेसबुक प्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सतीश तुंगे, प्रसन्ना घुमे, डॉ. राहुल पाटील, राजन, निलेश शेवाळे, राजेंद्र काळे, बाळू बरकले आणि मुकेश चव्हाणके यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करून पाहिले परंतु विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी (PM Relief fund) २०० करोड रुपयांचा चेक नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केल्याची एकही बातमी आम्हाला आढळली नाही. प्रदर्शित झाल्यापासून ‘द काश्मीर फाईल्स’च्या बाबत माध्यमांमध्ये सातत्याने नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांच्या बातम्या आलेल्या आहेत, तब्बल २०० कोटी रुपयांची मदत ही मोठी बाब आहे, यावर बातमी नसणे हे अशक्य आहे. म्हणून आम्ही व्हायरल दाव्यासोबतच्या फोटोची उलटतपासणी सुरु केली.

गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च केले असता १३ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या न्यूज १८ उत्तरप्रदेशची बातमी आम्हाला युट्युबवर मिळाली. या बातमीनुसार चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पंतप्रधान मोदींची सदीच्छा भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. या बातमीमध्ये कुठल्याही चेकचा किंवा कसल्याही मदत निधीचा उल्लेख नाही.

पिंकव्हीलाच्या ताज्या म्हणजेच ७ एप्रिलच्या रिपोर्टनुसार ‘द काश्मीर फाईल्स’ची आजवरची बॉक्स ऑफिस वरील कमाई २४४ कोटी रुपये झाली आहे. ही कमाई साधारण २५० कोटी रुपयांपर्यंत जाईल. त्याहून पुढे जाण्याची शक्यता नाही.

११ मार्च २०२२ रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला. ज्या दिवशी चित्रपटाच्या टीमने पंतप्रधानांची भेट घेतली तो अवघा तिसरा दिवस होता. तीन दिवसांत चित्रपटाने २६.०५ कोटी रुपये कमाई केली होती. यातून २०० कोटी देणे तर अशक्यच होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता (PM Relief fund) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात २०० कोटी रुपयांचा चेक सुपूर्द केल्याचे व्हायरल दावे फेक आहेत. व्हायरल होणारा फोटो चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तिसऱ्या दिवशीचा असून त्यावेळी चित्रपटाची कमाई केवळ २६.०५ कोटी रुपये झाली होती.

हेही वाचा: योगी आदित्यनाथ यांनी शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन केले आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

 1. Anonymous Anonymous April 10, 2022

  *•हिंदू नावाचे गाढव डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांसाठी हिंदू शब्दाचा सत्य इतिहास* •

  *हिंदू हा मराठी शब्द नाही,*
  *हिंदी पण नाही,*
  *संस्कृत पण नाही,*
  *इंग्लिश पण नाही*
  *मगधी पण नाही, ऐवमं*
  *हा शब्द भारतीय सुध्दा नाही…*

  *तो शब्द “परशियन” “फारशी” शब्द आहे…*

  इ.स १२ व्या शतकात मोघल जेव्हा भारतात आले. त्यांची बोली भाषा व लेखणी ‘परशियन’ ‘फारशी’ होती.
  भारतात येऊन जेव्हा भारतीयांना, भारतातल्या लोकांना हरवले तेव्हा त्यांनी हरलेल्या लोकांना हरविलेल्या लोकांना “हिंदू” हि तुच्छास्पद शिवी घातली. तेव्हा पासून “हिंदू” शब्द प्रचलित झाला.

  { भारतात कलकत्ता येथे मोठी लायब्ररी मध्ये परशियन डिक्शनरी आहे त्यात हिंदू शब्दाचा अर्थ तुम्ही सुद्धा बघू शकता.}

  ( Analysis of हिंदु:-
  परशियन डिक्शनरी मधल्या हिंदू शब्दाचा अर्थ
  हिनदू = गुलाम, चोर, घानेरडा, काल्या तोंडाचा.)
  हिंदू हा शब्द दोन शब्दाचा बनलेला नसून तिन शब्दाचा {हि+न+दू} असा आहे त्याचा अपभ्रंश होऊन दोन शब्दी हिंदू असा झाला आहे.)

  *दयानंद सरस्वती स्वतः १८७५ ला मान्य करताे व त्याच्या “सत्यार्थ प्रकाश” ह्या पुस्तकात ‘हिंदू हि मोघलांनी दिलेली शिवी आहे’ असे नमुद करताे..*

  शिवाय तो *हिंदू समाज स्थापन न करता, ” *आर्य समाज* स्थापन करतो.

  नंतर हिंदू पासून ‘हिंदूस्थान’ मोघलांनीच केला..पुढे त्याचा उहापोह विदेशी ब्राम्हणनानी भारतीय जनतेस गुलाम बनविन्यासाठी केला.

  ( Analysis of हिंदुस्तान :-
  हिन =म्हणजे तुच्छ, दलिद्र, घाणेरडा.
  दून= म्हणजे लोक, प्रजा, जनता..
  स्तान (स्थान)= म्हणजे ठिकाण , जागा..)

  *”भारत” कधीही ‘हिंदूस्थान’ नव्हता आणि नाही.*

  *इ.स १२ व्या शतका आगोदर हिंदू शब्द कोणत्याही ग्रंथात,बोलण्यात किंवा लिहीण्यात आलेला नाही, म्हणून तर खाली दिलेले (ब्राह्मणी ग्रंथ – रामायण, महाभारत, उपनिषध, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, श्रृति, स्मृति, मनुस्मृति, दासबोध, ४ वेद, १८ पुरान, ६४ शास्त्र किंवा बहुजन संतांच्या अभंग वाणीत, गाथेत, दोहात, भारूडात कशातच “हिंदू” हा शब्द सापडत नाही)*

  *इतिहास तपासून घ्यावा. किंवा बरोबर असेल तो सांगावा.*

  “हिंदू” हा शब्द या भारत देशाला किंवा प्रचलित धर्माला मोघलांनी दिला, आणि ब्राह्मण आपल्याला सांगत असतो “गर्व से कहो हम हिंदू है”

  *शिवी आम्ही गर्वाने कशी म्हणावी ???*

  *मोघलांनी जेव्हा हिंदूंना (गुलामांना हरलेल्यांना) झिजीया कर लावला तेव्हा तो झिजीया कर ब्राह्मणांनी देण्यास नकार दिला व मोघलांना सांगितले कि आम्ही ही तुमच्या सारखे बहेरून आलेले आहोत, तुमच्या पुर्वी इथल्या लोकांना आम्ही हरविले आहे. आम्ही झिजीया कर भरणार नाही कारण आम्ही हिंदू नाहीत.*

  *ब्राह्मण स्वतःला हिंदू कधिच म्हणवून घेत नाही , तो स्वतःला ” ब्राह्मणच ” म्हणवून घेतो पण तो शुद्रांना, अर्थात भारतीय एस.सी, एस.टी, ओबिसींना, धर्मपरिवर्तीतांना, ” हिंदू ” म्हणतो, आणि मानतो..!*

  *कोणत्याही बामनांच्या जात सर्टिफिकेट किंवा लिविंग सर्टिफिकेट वर जात धर्म – हिंदू ब्राह्मण लिहिले आहे का ? ? ? ते तपासून पहावे*.

  आपल्या नावाचा बारसा दुसऱ्यांनी घातला.
  हि गोष्ट विदेशी, यहूदी, यूरेशियन बामणाला 👹 माहीत आहे? पण त्या शब्दाचा वापर विदेशी बामणानी भारतातल्या मूळच्या लोकांना गुलाम बनऊन ठेवण्यासाठी केला. आपल्या मूलनिवासी बहुजनांना ही बाब माहीत नाही.

  अशी आहे हिंदू शब्दाची कर्म कहानी.?
  तुम्ही गर्वाने म्हणा , किंवा त्याचा प्रचार करा.
  घ्यायचे आहे ते नाव घ्या, आम्हाला हरकत नाही पण आम्हाला खरा इतिहास कळू द्या व भारतीय अज्ञानी जनतेला सांगू द्या.

  *मी प्रथम ही भारतीय आहे आणि शेवट ही भारतीय आहे.*

  *अधिक माहीतीसाठी वाचा*
  *हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही ?- श्रीकांत शेट्टे.*
  *बहुजन हिंदू आहेत काय ? – इतिहासकार अॅड. अनंत दारवटकर.*
  *सत्यार्थ प्रकाश – महर्षि दयानंद सरस्वती.*
  *धर्म शास्त्रांचा इतिहासात – भारतरत्न पा.वा.काणे.*
  *देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे – प्रभोधनकार ठाकरे.*

  *कृपया आपण सर्व ग्रुप पाठवा*

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा