‘तालिबान का मराठा (Maratha) और RSS खौफ’ अशा कॅप्शनसह एका मुस्लीम मौलवीसारख्या दिसणाऱ्या इसमाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. तालिबान (Taliban) दहशतवाद्यांनी मराठे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची धास्ती घेतली असल्याचा दावा केला जातोय.
‘Eternal हिंदू- श्वास्वत हिंदू’ नावाच्या फेसबुक पेजवर हे दावे करणारा व्हिडीओ पोस्ट केला गेलाय. बातमी करेपर्यंत या पोस्टला ५८९ लोकांनी शेअर केले होते.
ट्विटरवरही हेच दावे पहायला मिळतात. अनेकांनी या संबंधीचे युट्युब व्हिडीओज देखील शेअर केले आहेत.
व्हॉट्सऍपवरही हेच दावे व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक केतन देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
- ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडिओच्या कोपऱ्यात असलेला लोगो बारकाईने पाहिला. ‘NWAA Studios‘ असे त्यावर लिहिले आहे.
- त्याविषयी शोधाशोध केली असता तो एक पाकिस्तानातील इस्लामाबादचा न्यूज चॅनल असल्याचे समजले.
- हाच धागा पकडून विविध कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता युट्युबवर ‘खालिद मेहमूद अब्बासी ऑफिशियल’ या चॅनलवर तो संपूर्ण व्हिडीओ मिळाला.
‘खालिद मेहमूद अब्बासी’ कोण?
- खालिद मेहबूब अब्बासी नावाने सर्च केल्या नंतर या व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट आम्हाला सापडले. त्याच्या बायोमध्ये त्यांचा पत्ता ‘इस्लामाबाद, पाकिस्तान’ असे लिहिले आहे.
- युट्युब चॅनलच्या बायोमध्ये ‘सदर चॅनल कुराण आणि सच्च्या मुस्लीम विचारांचा प्रसार करण्यासाठी’ असल्याचे लिहिले आहे. तसेच या व्हिडीओच्या खाली असलेल्या माहितीमध्ये ‘शुब्बन उल मुस्लिमीन’ या संघटनेचाही उल्लेख आहे.
- ‘शुब्बन उल मुस्लिमीन’ नावाच्या संघटनेविषयी शोधाशोध केली असता त्यांची वेबसाईट सापडली. ‘www.shubban.pk’ अशी ती वेबसाईट आहे. वेबसाईटच्या डोमेन नेम मधील ‘.pk’ हे एक्सटेन्शन पाकिस्तानी साईट असल्याचे स्पष्टपणे दर्शवते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मराठ्यांना (Maratha) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) तालिबानी घाबरून असल्याचे सांगत व्हायरल होत असलेल्या व्हिडीओशी तालिबान्यांचा (Taliban) काहीएक संबंध नाही. २०१९ साली रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओतील व्यक्ती पाकिस्तानी असून त्यांचे नाव खालिद मेहबूब अब्बासी’ असे आहे. याचाच अर्थ व्हायरल दावे फेक आहेत.
हेही वाचा: केरळमधील मुस्लिमांनी तलवारीने आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे का?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]