Press "Enter" to skip to content

महाराष्ट्रात ४७ ‘हाथरस’ म्हणत उद्धव ठाकरेंना ट्रोल करणाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल!

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्यावर आधी महाराष्ट्रातील ४७ ‘हाथरस’ सारख्या घटनांकडे (47 rape cases under Uddhav Thackeray regime) बघा म्हणत त्यांना ट्रोल केलं जातंय.

Advertisement

‘उद्धव ठाकरे ने कहा हाथरस जैसी घटनाए महाराष्ट्र में सहन नहीं की जायेगी’ आणि ‘एक दोन नाही महाराष्ट्रात घडले ४७ ‘हाथरस’; राज्यातील धक्कादायक आकडेवारी समोर’ या हेडलाईनखालील दोन बातम्यांचे स्क्रिनशॉट फिरवले जाताहेत. ‘घरसे निकलते ही’ आणि ‘कुछ दूर चलते ही’ अशा कॅप्शनसह हे स्क्रिनशॉट फिरवले जाताहेत.

भाजपशी संबंधित नितीन काळे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकलीये.

FB post trolling uddhav thackeray on 47 Hathras checkpost marathi
Source: Facebook

अर्काईव्ह लिंक

फेसबुक युजर हर्षल साळवी यांची पोस्ट ३७ युजर्सकडून शेअर करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=211996110343991&id=100046008101501

अर्काईव्ह लिंक

अशाच प्रकारच्या फेसबुक पोस्ट आपण ‘येथे‘, ‘येथे‘ आणि ‘येथे‘ पाहू शकता. ट्विटरवर सुद्धा अनेकांनी अशाच अर्थाचे ट्विट आहेत.

ट्विटर युजर मनेषा यांनी हा स्क्रिनशॉट ट्विट केलाय. त्यांना ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री फॉलो करतात.

अर्काईव्ह लिंक

हेच ग्राफिक्स व्हॉट्सऍपवर सुद्धा चांगलेच व्हायरल झाले आहे. याबद्दलची माहिती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी दिली होती.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात करताना आधी या दोन्ही बातम्यांच्या खरेपणाची पडताळणी केली. लोकमतच्या ‘४७ हाथरस’ बद्दलच्या (47 rape cases under Uddhav Thackeray regime) बातमीचा स्रोत असणारी ‘इंडियन एक्स्प्रेसची बातमी सुद्धा शोधून वाचली. त्यामध्ये बातमीचा संदर्भ NCRB रिपोर्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे NCRBच्या रिपोर्ट मध्ये?

‘National Crime Record Bureau’ या संस्थेअंतर्गत देशभरात घडलेल्या संपूर्ण वर्षाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांची एक आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार मागच्या वर्षभरात राज्यानुसार, तेथील मेट्रो सिटीज नुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या असलेला एक मोठा रिपोर्ट पब्लिश करण्यात आला.

या रिपोर्टच्या ‘खंड १- ३A’ नुसार महिलांविषयी घडलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. २०१९ च्या वर्षभरात उत्तर प्रदेशात सर्वात जास्त ५९,८५३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचवेळी महाराष्ट्रात ३७,१४४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या लिस्टमध्ये उत्तरप्रदेश मग राजस्थान आणि त्या नंतर महाराष्ट्र अशी क्रमवारी लागते.

परंतु याच रिपोर्टनुसार महिलेवर बलात्कार अथवा सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यातील गुन्ह्यांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. ४७ गुन्हे महाराष्ट्रात, ३७ मध्यप्रदेशात आणि ३४ उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत. म्हणजेच बातमीतील आकडेवारी रिपोर्टनुसार खरीच आहे.

आकडेवारीस उद्धव ठाकरे किती जबाबदार?

NCRBच्या वेबसाईटवर हे रिपोर्ट तयार करण्यासाठी काय पद्धती वापरली हे सांगणारे एक दस्तावेज आहे. यानुसार त्यांनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या दरम्यान राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्था यांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांचा मिळून हा रिपोर्ट असल्याचे सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ २८ नोव्हेंबर २०१९ रोजी घेतली होती. म्हणजे नोव्हेंबर महिना संपण्यासाठीचे २ दिवस आणि डिसेंबरचा संपूर्ण महिना असे ३३ दिवस ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २०१९ मध्ये नेतृत्व केले.

त्या आधी २३ ते २६ नोव्हेंबर म्हणजे अजित पवार यांच्यासोबतचे ३ दिवस आणि त्या आधी १ जानेवारी २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते.

याचा अर्थ ११ दिवसाची राष्ट्रपती राजवट, ३३ दिवसाचं उद्धव ठाकरे सरकार म्हणजे वर्षभरातील ४४ दिवस वगळता इतर दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं शासन-प्रशासन कार्यरत होतं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये NCRBच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रात बलात्कार/ सामुहिक बलात्कार करून हत्या करण्याच्या ४७ घटना घडल्या आहेत हे सत्य आहे. परंतु त्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्षभराच्या कालखंडात जवळपास ३२१ दिवस देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करत होते. म्हणून त्यांना देखील या ४७ घटनांसाठी जबाबदार धरणे संयुक्तिक ठरणार नाही कारण NCRBचा रिपोर्ट वर्षभराचा आहे. कोणत्या महिन्यात किती घटना घडल्या याविषयीची नोंद त्यात नाही.

हेही वाचा: राहुल गांधींनी पोलिसाची कॉलर पकडली? वर्दीवर हात टाकला? जाणून घ्या सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा