Press "Enter" to skip to content

टोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक!

जपानची राजधानी असलेल्या टोक्यो शहरात यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धा (tokyo olympics) आयोजित केल्या आहेत. तिरंग्याचा ड्रेस कोड परिधान करून सूर्यनमस्काराने (surya namskar) या सोहळ्याची सुरुवात झाल्याचे दावे करत एक व्हिडीओ सोशल मीडियात फिरत आहे.

'Surya  namaskar being performed at the opening ceremony of Olympics in Tokyo Japan with our National flag Dress Code…
Video: 3.14 min
Take pride in spreading our culture throughout the world.. 🌷'
Advertisement

अशा कॅप्शनसह तो ३.१४ मिनिटाचा व्हिडीओ फेसबुक, ट्विटरवर व्हायरल होताना दिसतोय.

https://twitter.com/thrivikraman_s/status/1419133557469970433
अर्काईव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी यांनी व्हॉट्सऍपवरही सदर व्हिडीओ आणि दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. व्हायरल दाव्यांच्या पडताळणीतही त्यांचे सहकार्य लाभले.

पडताळणी:

  • टोक्यो ऑलिम्पिकच्या (tokyo olympics) उदघाटन सोहळ्याची सुरुवात सूर्यनमस्काराने (surya namskar) झाल्याचा दावा करणाऱ्या व्हिडीओच्या की-फ्रेम्स रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिल्या असता व्हिडिओमागचे सत्य समोर आले.
  • युट्युबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेल्या अधिकृत चॅनलवरून तब्बल ६ वर्षांपूर्वी २९.४० मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.
  • या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सदर व्हिडीओ मंगोलियाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’कडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते.
  • खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ मे २०१५ रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत याविषयी माहिती दिली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूर्यनमस्काराचा व्हिडीओ टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचा नसून ७ वर्षांपूर्वी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने मंगोलियात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील आहे.

हेही वाचा: भाजप राजवटीतीलच हिंसक मुलींच्या जमावाचा फोटो ‘काँग्रेस का कश्मीर’ म्हणून व्हायरल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा