Press "Enter" to skip to content

युवकाला बुटाने पाणी पाजणाऱ्या व्हिडीओला जातीवादाचे लेबल! वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

सोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. एका युवकास बुटामध्ये पाणी भरून जबरदस्तीने पिण्यास भाग पाडले जात आहे. या एकंदर प्रकाराचे कारण जातीवाद असल्याचे सांगितले जात आहे. (man forced to drink water by shoe)

Advertisement

राजस्थानी पेहरावातील व्यक्ती आपल्या बुटाने म्हणजेच मोजडीने खाली बसलेल्या युवकास जबरदस्तीने पाणी पिण्यास भाग पाडतेय आणि त्याच बुटाने त्याच्या डोक्यात सुद्धा मारले जातेय. अशा दृश्यांचा व्हिडीओ ‘राजस्थान में इस युवा को जबरन पिलाया पेशाब और जूते में भरकर पानी, मगर पेशाब और जूते में पानी पिलाने वालों को कौन देगा सजा, क्या समाज के ये ठेकेदार ऐसे ही प्रताड़ित करते रहेंगे दलितों-वंचितों को…’ अशा प्रकारे कॅप्शन देऊन ‘जनजवार डॉट कॉम’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. त्यास बातमी करेपर्यंत तब्बल ६,६०४ जणांनी शेअर केले आहे.

Janjwar fb post with video of people forcing man t drink water by shoe checkpost marathi
Source: Facebook

तोच व्हिडीओ या आठवड्यात पुन्हा एकदा व्हायरल होऊन समोर आला असून अशाच प्रकारच्या कॅप्शनसह पोस्ट केला जातोय. (man forced to drink water by shoe)

‘आज एक दलित को जूते मैं पानी पिलाकर सम्मान देता ठाकुर. दलितों सबसे बडी़ तुम्हारी कमी ये है कि तुम सिर्फ जातियों में खुद को बांट रहे हो, जय भीम बोलने से अच्छा है उनके विचारों को जानना लेकिन जबतक पिछडे़ वर्ग के साथ नहीं आओगे तुम्हारा शोषण निश्चित है’ अशा मजकुरासह सोनी सिंह या फेसबुक युजरने सदर व्हिडीओ पोस्ट केलाय.

अविनाश खटीक या युजरने देखील ‘जातीवाद का नंगा नाच’म्हणत व्हिडीओ शेअर पोस्ट केलाय त्यास ६१ शेअर्स आहेत.

देखिये #जातिवाद का नंगा नाचराज्यस्थान में #सवर्ण लोगो ने #अवर्ण युवक को जूते से पानी पिलाया#vndnason #AzadSamajParty

Posted by अवनीश खटीक on Thursday, 15 October 2020

अर्काइव्ह लिंक

अशाच प्रकारे अनेकांनी या व्हिडीओला दलित-सवर्ण वाद, जातीवाद म्हणत सोशल मीडियात पोस्ट केले आहे. (man forced to drink water by shoe)

Viral FB posts with video of people forcing man drink water by shoe checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी:

व्हिडीओमधील दृश्यांवरून, पेहरावावरून आणि भाषेवरून हे राजस्थानमधील आहे याचा सहज अंदाज बांधता येतो. त्याच दृष्टीने काही कीवर्ड्स टाकून सर्च केले असता आम्हाला दैनिक भास्करची ४ महिने जुनी एक बातमी सापडली.

‘सजा के नाम पर अमानवीयता:राजस्थान में शादीशुदा महिला से प्रेम प्रसंग होने पर युवक को जूते में पानी और पेशाब पिलाया, पांच गिरफ्तार’ या हेडलाईनसह बातमी प्रसिद्ध केलेली आहे. पाली जिल्ह्यातील सुमेरपूर येथे विवाहित स्त्री सोबत प्रेमसंबंध ठेवल्या प्रकरणी गावातील लोक त्यास शिक्षा देत आहेत असे त्यात लिहिले आहे. विवाहिता आणि या तरुणाची जात एकच असल्याचेही बातमीत म्हंटले आहे. त्यात कुठेही दलित-सवर्ण वादाचा काही संबंध असल्याचे लिहिलेले नाही.

Dainik Bhaskar news screenshot about man forced to drink water by shoe checkpost marathi
Source: Dainik Bhaskar

दारूच्या बाटलीत मुत्र भरून त्यास पिण्यास दिले, त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या भावाला आणि चुलत्यानाही या लोकांनी बांधून मारहाण केली अशा प्रकारच्या माहितीच्या बातम्या न्यूज १८, पत्रिका आणि फ्री प्रेस जर्नल या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. यातील अधिकच्या मजकुरानुसार मारहाण करणारे लोक सुद्धा त्याच युवकाच्या जातीचे असून ती एक जातपंचायत आहे. त्यांनी शिक्षा देऊन मारहाण करून सुद्धा कुटुंबाकडून ५००० रुपये घेतल्यानंतरच युवकास सोडून दिले.

यासंबंधी पोलिसांपर्यंत व्हायरल व्हिडीओ आणि घटनेची माहिती पोहचल्यानंतर त्यांनी स्वतःहून घटनास्थळी जाऊन सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. याविषयी दैनिक जागरणने केलेल्या व्हिडीओ न्यूजमध्ये पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली आहे.

Rajasthan में युवक को जूते में भरकर पिलाया पानी

Rajasthan के सिरोही में युवक को जूते में भरकर पिलाया पानी, आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार

Posted by Dainik Jagran on Wednesday, 17 June 2020

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (man forced to drink water by shoe) व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. सादर घटना सवर्ण-दलित वाद किंवा जातीवादाच्या कारणामुळे घडलेली नसून हे प्रकरण जातपंचायतीच्या अमानुषपणाचे आहे. पिडीत युवकाचे त्याच्याच जातीच्या विवाहीतेशी प्रेमसंबंध होते म्हणून तिच्या गावातील जातपंचानी युवकावर अशाप्रकारे शिक्षेच्या नावाखाली अत्याचार केले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुस्लिम ‘एसपी’ युनिफॉर्म ऐवजी हिजाब मध्ये? वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा