Press "Enter" to skip to content

पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम जमावाने जखमी जवानाला रुग्णालयात नेताना अडवल्याचे दावे फेक!

मुस्लीम समुदायाने जखमी CRPF जवानाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ताफ्यास अडवून धरले. भाजपला निवडून न देण्याचे हे फळ आहे. भारतीय लोकशाही संकटात असून CAA लागू करण्याची गरज असल्याच्या मेसेजेससह सोशल मिडियातून एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. (muslims blocked CRPF convoy)

Advertisement

व्हायरल मेसेज:

‘हा तीन मिनीटांचा व्हिडीओ जरूर बघाच. व्हिडीओ बघताना तुम्हाला वाटेल की हा बांगलादेश किव्हा पापिस्तान मधला आहे. पण नाही…. हा प्रसंग घडलाय शांतिदूतांचे वास्तव्य असलेल्या पश्चिम बंगाल मधे. व्हिडीओ बघितल्यावर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल, मुठी आवळल्या जातील, कदाचित डोळ्यातून अश्रू पण वहातिल. हा शांतिदूतांचा बालेकिल्ला जिथे देशाच्या रक्षणकर्त्या CRPF च्या गंभिर जवानाला रूग्णालयात नेण्यापासून अडवले गेले. अत्यंत शांतिप्रिय मार्गाने ही अडवणुक केली गेली 😡. याच बंगाल मधे निवडणूक जिंकल्यानंतर अनेक राजकीय पुढार्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कोणाला ती बंगालची खरी वाघिण वाटली तर कोणाला कशी जिरवली भाजप ची म्हणून आनंदाला पारावार राहिला नाही. भाजप ने तर कुठेही काचकूच न करता सत्तेवर आल्याच CAA लागू केल जाईल हे जाहिरपणे सांगितले. कशासाठी हवाय CAA हे हा व्हिडीओ बघितल्यावर एका उदाहरणावरून लगेचच समजेल …………’

हा तीन मिनीटांचा व्हिडीओ जरूर बघाच. व्हिडीओ बघताना तुम्हाला वाटेल की हा बांगलादेश किव्हा पापिस्तान मधला आहे. पण नाही…. हा प्रसंग घडलाय शांतिदूतांचे वास्तव्य असलेल्या पश्चिम बंगाल मधे. व्हिडीओ बघितल्यावर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल, मुठी आवळल्या जातील, कदाचित डोळ्यातून अश्रू पण वहातिल. हा शांतिदूतांचा बालेकिल्ला जिथे देशाच्या रक्षणकर्त्या CRPF च्या गंभिर जवानाला रूग्णालयात नेण्यापासून अडवले गेले. अत्यंत शांतिप्रिय मार्गाने ही अडवणुक केली गेली 😡. याच बंगाल मधे निवडणूक जिंकल्यानंतर अनेक राजकीय पुढार्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कोणाला ती बंगालची खरी वाघिण वाटली तर कोणाला कशी जिरवली भाजप ची म्हणून आनंदाला पारावार राहिला नाही. भाजप ने तर कुठेही काचकूच न करता सत्तेवर आल्याच CAA लागू केल जाईल हे जाहिरपणे सांगितले. कशासाठी हवाय CAA हे हा व्हिडीओ बघितल्यावर एका उदाहरणावरून लगेचच समजेल …………

Posted by Dattanand Shirodkar on Thursday, 20 May 2021

अर्काईव्ह लिंक

हे दावे व्हॉट्सऍपवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गोविंद भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले आणि (muslims blocked CRPF convoy) पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने (muslims blocked CRPF convoy) व्हायरल व्हिडीओ बारकाईने अभ्यासला, त्यातून स्पष्ट झालेल्या बाबी पुढीलप्रमाणे-

१. ती सैन्याची गाडी भारतातील नाही

व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या गाडीचा नंबर पाहिल्यास लक्षात येते की तो नंबर लिहिण्यासाठी वापरलेली भाषा बांग्ला आहे, परंतु ती गाडी सैन्याची आहे. भारतात सैन्याच्या गाडीचे नंबर राज्यातील स्थानिक भाषेत लिहिलेले नसतात, ते इंग्रजीमध्येच लिहिण्याचा नियम आहे. म्हणजेच ही गाडी आणि ते दृश्य भारतातील नाही.

source: whatsapp

२. ते सैनिक बांग्लादेशाचे

व्हायरल व्हिडीओमधील सैनिकांच्या दंडावर असणारा बॅज भारतीय सैन्याचा अथवा CRPFचा नाही. तो नेमका कुठला हे शोधण्यासाठी रिव्हर्स सर्चचा आधार घेतला असता ढाका ट्रिब्युन या बांग्लादेशी वृत्तपत्राचा लेख आम्हाला सापडला. महिला दिनानिमित्त सैन्यातील दोन महिलांची मुलाखत यामध्ये आहे. पैकी लेफ्टनंट कर्नल फरहान आफरीन यांच्या दंडावर तोच लाल रंगाचा दोन तलवारी असणारा बॅज दिसून येतो.

तसेच सैनिकाच्या खांद्यावर AMC असे लिहिले आहे. हा Army Medical Corps या बांग्लादेशी सैन्याच्या एका विभागाच्या नावाचा शॉर्टफॉर्म आहे.

Bangladesh Army Logo
Source: Dhaka Tribune/ Whatsapp

३. या व्हिडीओमागचे नेमके कारण

बांग्लादेशातील विविध माध्यमांच्या बातम्यानुसार २७ मार्च २०२१ रोजीची ही घटना आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीला विरोध करताना आंदोलक आणि पोलिसांत चकमक झाली होती, त्यात ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. याचाच राग म्हणून दुसऱ्या दिवशी चितगावच्या हाथझरी रोडवर मदरशातील विद्यार्थ्यांनी सैन्याचा ताफा अडवून धरला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की (muslims blocked CRPF convoy) व्हायरल व्हिडीओसह फिरत असलेल्या मेसेजमधील दावे निखालस खोटे आहेत. सदर व्हिडीओचा पश्चिम बंगालशी काहीएक संबंध नाही. तो व्हिडीओ बांग्लादेशातील आहे.

हेही वाचा: नागपूरच्या मोमीन मार्केटमधील गर्दीचा म्हणून शेअर केला जातोय पाकिस्तानातील व्हिडीओ!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा