राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नागपूर शहराच्या अल्पसंख्यांक विभागाचा शहर कार्यकारी अध्यक्ष अरबाज खानने (NCP Arbaaz Khan) हिंदूंना शिवीगाळ करत भारत सोडून जाण्याची धमकी दिल्याने संतप्त जमावाने त्यास बेदम चोप दिला असा दावा करणारी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियातून जोरदार व्हायरल होत आहे.
“अरबाज़ खान ने फ़ेसबुक पर हिन्दुओ और हिन्दू माँ बहनों को गाली देकर देश छोड़कर भाग जाने का बोला ,उसको नागपुर की जनता ने उसकी औकात दिखा दी!” या अशा कॅप्शनसह फेसबुकवर व्हिडीओज शेअर होताना दिसत आहेत.
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओ मध्ये दोन भाग आहेत. एकात अरबाज खानने (NCP Arbaaz Khan) केलेली शिवीगाळ आहे तर दुसऱ्या भागात गाड्यांची तोडफोड करत जमावाने केलेली मारहाण दिसत आहे.
याच व्हायरल पोस्ट्सोबत आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये असे तीन भाग आहेत. पहिल्या भागात शिवीगाळ असून दुसऱ्या भागात अरबाज खानने कबुली दिली आहे. सदर व्हायरल व्हिडीओ जुना असून आपण हिंदू बांधवांची माफी मागत आहोत असे सांगितले आहे. तर शेवटच्या भागात तोच मारहाणीचा व्हिडीओ आहे.
याचाच अर्थ शिवीगाळ करणारा व्यक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नेता अरबाज खानच आहे परंतु मारहाणीच्या व्हिडिओचे काय? यासाठी आम्ही रिव्हर्स सर्च केले असता काही ट्विट्स समोर आले ज्यातून सदर घटना पंजाबमधील सांचोली गावची आहे. जमिनीच्या वादावरून झालेली ही हाणामारी होती.
हाच धागा पकडून सर्च केले असता ‘अमर उजाला‘ आणि ‘ईटीव्ही भारत’ च्या सविस्तर बातम्या सापडल्या.
नुरेरा गावच्या सरपंचानी दिल्लीत राहणाऱ्या साक्षी महल यांच्याकडून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरजवळ जमीन घेतली होती. याच्याच व्यवहारावरून वाद पेटला. आवाजाने गावचे लोक एकत्र आले आणि वाद मिटण्या ऐवजी अधिक चिघळला. त्यात त्यांनी ७ महागड्या कारची तोडफोड केली. बाहेरून आलेल्या लोकांना बेदम चोप दिला. झटापटीत सरपंचावर गोळ्या झाडल्या गेल्या.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की हिंदूंना शिवीगाळ करणारी व्यक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी संबंधित असून त्याचे नाव अरबाज खान (NCP Arbaaz Khan) हेच आहे. परंतु त्यास जमावाने मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही. जमिनीवरून झालेल्या वादाचा सदर व्हिडीओ आहे.
हेही वाचा: मुकेश अंबानींनी नातू झाल्याच्या आनंदात कोरोना नियमांचे केले उल्लंघन? मुख्यमंत्रीसुद्धा सामील?
[…] […]