Press "Enter" to skip to content

‘तो’ व्हायरल व्हिडीओ श्रीनगरमध्ये दहशतवाद्याला पकडतानाचा नाही, ती घटना ब्राझीलची!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीनगरमध्ये दहशतवाद्याला अटक (srinagar terrorist arrested) करण्यात आल्याचे व्हिडीओज जोरदार व्हायरल होत आहेत. मोटारसायकलवरील इसमास पोलीस कारमधून उतरून चित्रपटाप्रमाणे उंच उडी मारत लाथ मारून खाली पाडणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तो चित्तथरारक व्हिडीओ आहे. दावा केला जातोय की श्रीनगरमध्ये दहशतवाद्याला पकडतानाचा हा थरार आहे.

Advertisement

फेसबुक युजर अमरजित लिगदे यांनी ‘श्रीनगर अतिरेक्याला फिल्मीस्टाईल अटक’ अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यानंतर त्यांनी कॅप्शनमध्ये बदल करत ‘याची सत्यता पडताळून पाहणे’ अशी सूचना देखील दिली परंतु बातमी करेपर्यंत ३५२ लोकांनी ती पोस्ट शेअर केली होती.

Srinagar Terrorist arrested viral video claim on FB
Source: Facebook

ट्विटरवरही हिंदी इंग्रजीत हेच दावे व्हायरल होतायेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. जवाहरलाल साळुंखे आणि प्रशांत यमजाल यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. व्हिडीओच्या पडताळणीसाठी समीर गायकवाड यांची विशेष मदत लाभली.

पडताळणी:

 • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स यांडेक्सवर रिव्हर्स सर्च करून पाहिल्या आणि ती घटना ब्राझीलमधील पेरोला येथील असल्याचे समजले.
 • सविस्तर बातमीसाठी गुगल सर्च केले असता २ ऑगस्ट २०२१ रोजी ब्राझीलच्या ओबेमदीतो या पोर्च्यूगल भाषेतील न्यूज वेबसाईटवरील बातमी आम्हाला सापडली.
 • बातमीचा स्क्रिनशॉट:
news report on the incident
Source: Obemdito
 • बातमीनुसार तरूण बाईकस्वार जोरदार वेगाने रस्त्यावरून गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने गाडीचा वेग अजूनच वाढवला आणि इतर नागरिकांचा जीव धोक्यात आणत गाडी चालवू लागला. त्याला अडवण्यासाठी पोलिसांना व्हिडीओत दिसणारी ती कसरत करावी लागली.
 • डेलीमोशनवर या व्हायरल व्हिडीओचे मूळ व्हर्जन अपलोड केले आहे. यामध्ये नागरिकांची भाषा, त्यांची वेशभूषा यावरून देखील ती घटना श्रीनगरमधील नसल्याचेच स्पष्ट होतेय.
Source: Dailymotion

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की श्रीनगरमध्ये दहशतवाद्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचे (srinagar terrorist arrested) दावे फेक आहेत. तो व्हिडीओ ब्राझीलमधील असून त्यातील इसम दहशतवादी नव्हे तर निष्काळजीपणे बाईक चालवणारा बाईकस्वार होता.

हेही वाचा: पंडित नेहरू आणि मुहम्मद अली जिन्ना सावत्र भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्ट्स फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा