Press "Enter" to skip to content

माध्यमांनी चालवल्या ‘फ्री सिलाई मशीन’ योजनेच्या बातम्या, पण सरकार म्हणते अशी कुठली योजनाच नाही!

मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी कथितरित्या केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री फ्री सिलाई मशिन’ योजनेच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आल्याची माहिती या बातम्यांमध्ये देण्यात आली आहे.

Advertisement

योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत सिलाई मशीन वितरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक बातम्यांमध्ये योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची तपशीलवार माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची यादी देखील बघायला मिळतेय.

अर्काइव्ह

‘झी न्यूज’, ‘एबीपी न्यूज’, ‘टाईम्स नाऊ हिंदी’, ‘न्यूज नेशन‘च्या वेबसाईटवर या योजनेसंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Source: Zee News/ ABP News/ Times Now/ News Nation

दरम्यान, आता केंद्र सरकारची अशी कुठली योजनाच नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

सदर दावा खोटा असून केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कुठलीही योजना चालवली जात नाही. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध रहा, असा इशारा माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

अर्काइव्ह

केंद्र सरकारकडून जरी केंद्राची अशी कुठलीही योजना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी माध्यमांनी या बातम्या कुठल्या आधारे प्रसिद्ध केल्या हे शोधण्याचा प्रयत्न केला. बहुतेक बातम्यांमध्ये India.gov.in या वेबसाइटवरून योजनेसाठी अर्ज करता येईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या वेबसाईटवर जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

National Government service portal Haryana sewing machine scheme
Source: india.gov.in

वेबसाईटवर हरियाणा सरकारच्या श्रम कल्याण बोर्डाच्या शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची लिंक बघायला मिळाली. या योजनेंतर्गत शिलाई मशीन खरेदीसाठी 3500 रुपये अनुदान दिले जात आहे. योजनेंतर्गत फ्री शिलाई मशीन वाटप केले जात असल्याचा कुठलाही उल्लेख बघायला मिळाला नाही. शिवाय या योजनेशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केंद्र सरकारकडून देशभरातील महिलांना मोफत शिलाई मशीन वितरणासाठी योजना सुरु करण्यात आल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. सरकारकडूनच केंद्राची अशा प्रकारची कुठलीही योजना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- कोरोनाची लस घेतलेल्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५००० रुपये बक्षिस रक्कम? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा