Press "Enter" to skip to content

गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना बरा होत नाही, सोशल मीडियावरील दावा चुकीचा!

कोरोना व्हायरसला घालविण्यासाठी १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या आठवड्याभरात दररोज फक्त ५ मिनिटे गरम पाण्याची वाफ घेण्याचा (Steam therapy for corona) आग्रह सोशल मीडियावर केला जात आहे. यामुळे कोरोना बरा होण्याचा दावा केला जातोय.

Advertisement

या उपचार पद्धतीचा फायदाच होईल. त्याचे कुठलेही साईड इफेक्टस नाहीत. त्यामुळे आपला मित्र परिवार, नातेवाईकांना हा उपाय सुचविण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

Source: Facebook

हाच दावा ट्विटरवर देखील करण्यात येतोय.

अर्काइव्ह पोस्ट

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सोशल मीडियावरील या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही ‘can water steam inhalation kill corona virus’ असे कीवर्ड्स वापरून गुगल सर्च केलं. त्यावेळी आम्हाला ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा यासंबंधीचा एक रिपोर्ट वाचायला माल मिळाला.

या रिपोर्टमध्ये ‘लसूण, आले, लाल मिरची, चहापत्ती, निलगिरी कडुनिंब अथवा तेल यांपैकी काहीही टाकून किंवा तसेच गरम पाण्याची वाफ घेतल्यास श्वसनासंबंधी त्रासदायक ठरणारे विषाणू जसे की कोरोना, इंफ्ल्यूएन्झा, ह्रीनोव्हायरस वगैरे मरून जातात’ अशा दाव्यांची पडताळणी केली आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) किंवा जागतिक आरोग्य संघटना (WHO) या दोन्ही संस्थांची वाफेच्या अशा कुठल्याही उपचार पद्धतीला मान्यता नाही. या अशा वाफेच्या इलाजाची कुठलीही वैज्ञानिक चाचणी झाली असल्याचे ऐकिवात नाही असे रॉयटर्सने CDCच्या हवाल्याने  म्हंटले आहे.

औषधींच्या जोडीला वाफ घेतल्याने जास्तीत जास्त सर्दी तापासारख्या आजारांवर काहीसा फरक पडू शकतो, पण सर्दी ताप पूर्णपणे बरे होण्यासाठी निव्वळ वाफ घेण्याचा मार्ग प्रभावी नाही असे शास्त्रीय अभ्यासातून समोर आले आहे.

अपोलो हॉस्पिटलच्या ‘आस्क अपोलो’ वेबसाईटवर देखील याच प्रश्नाच्या उत्तरात वाफ घेण्याने कोरोना व्हायरस मरत असल्याचे (Steam therapy for corona) सिद्ध करणारे कुठेलेही पुरावे उपलब्ध नाहीत, असेच सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होत असण्याचा दावा निराधार असल्याचे स्पष्ट झाले.

प्रमाणापेक्षा जास्त गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचेला आणि अंतर्गत नाजूक अवयवांना सुद्धा इजा मात्र पोहचू शकते. त्यामुळे या उपचार पद्धतीचे साईड इफेक्टस नाहीत, असे म्हणणे देखील चुकीचेच असल्याचे स्पष्ट होते.

हे ही वाचा- कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक? गौडबंगाल असण्याची शक्यता?

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा