Press "Enter" to skip to content

होमिओपॅथीक औषधी ‘एस्पीडोस्पर्मा क्यू’च्या सेवनाने ऑक्सिजनची पातळी मेंटेन केली जाऊ शकते का?

कोरोना विरोधातील लढाईत देशातील अनेक राज्यांना ऑक्सिजनच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची टंचाई असलेल्या राज्यांना खास ऑक्सिजन ट्रेनच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. मात्र तरीसुद्धा ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. सध्या सोशल मीडियावर ‘एस्पीडोस्पर्मा क्यू’ (aspidosperma q) या होमिओपॅथिक औषधाचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल तर एक कप पाण्यात या औषधाचे 20 थेंब टाकून पिल्यास लगेच ऑक्सीजची पातळी मेंटेन होईल आणि ही दीर्घकाळासाठी मेंटेन राहील.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

हे दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी, प्रफुल, करण गायकवाड आणि शिवम अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही गुगलवर किवर्ड सर्च केलं असता आम्हाला ‘वेबदुनिया’चा रिपोर्ट मिळाला. आयुष मंत्रालयातील वैज्ञानिक सल्लागार डॉ. एके द्विवेदी यांनी ‘वेबदुनिया’शी बोलताना सांगितले की,

” ‘एस्पीडोस्पर्मा क्यू’ (aspidosperma q) या औषधाबरोबरच कार्बो वेज देखील दिले जात आहे. यामुळे बर्‍याच लोकांना फरक देखील पडताना दिसतोय. मात्र हे केवळ ऑक्सीजन सैचुरेशनची पातळी काही पॉईंट्स कमी असेल तरच शक्य आहे. परंतु त्रास जर खूप जास्त असेल तर ऑक्सिजनची आवश्यकता असतेच असते.”

इंदूरच्या गुजराती होमिओ मेडिकल कॉलेजच्या व्याख्यात्या डॉ. सरिता जैन (एमडी) सांगतात सांगतात की, ‘तात्पुरत्या वेळेसाठी ऑक्सिजनची पातळी वाढू शकते, मात्र ती कायम कायम राखली जाते, हा दावा चुकीचा आहे. शिवाय ‘एस्पीडोस्पर्मा क्यू’ सह कार्बो वेज देखील घ्यायला लागते. ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास ती मदत करते. सध्या ऑक्सीजनची पातळी 85 पेक्षा कमी असेल तर ऑक्सिजनची आवश्यकता भासते. तुमची ऑक्सिजनची पातळी 90 च्या वर असेल तर हे औषध प्रभावी ठरू शकते, मात्र ऑक्सिजनची पातळी त्या खाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य.

दै. भास्करच्या रिपोर्टमध्ये आम्हाला साथरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांची प्रतिक्रिया वाचायला मिळाली. लहारिया सांगतात की अशा प्रकारचे दावे संपूर्णतः चुकीचे आहेत. पीडित रूग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजनशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. रुग्णास ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्याला ऑक्सिजनच देणे गरजेचे आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धते अभावी ऑक्सीजचा पर्याय म्हणून रुग्णाला दुसरे कुठलेही औषध देणे, हे रुग्णाच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.

होमिओपॅथिक डॉ. पीएम पाल चौधरी यांनी देखील काहीसे असेच मत नोंदवले. डॉ. पीएम पाल चौधरी म्हणतात की वैद्यकीय संशोधना शिवाय अशा प्रकारचा दावा करणे चुकीचे आहे. त्यामुळे रुग्णांनी ऑक्सिजनला पर्याय म्हणून अशा प्रकारची कोणतीही गोळी किंवा औषध घेऊ नये.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये ‘एस्पीडोस्पर्मा क्यू’च्या वापरासंबंधी एकवाक्यता बघायला मिळत नाही. परंतु एक मात्र निश्चित की सध्याच्या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरोनावर घरगुती उपाय न करण्याचा सल्ला मात्र सर्वच तज्ज्ञांकडून देण्यात येतोय. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारचे उपचार टाळलेलेच बरे.

हे ही वाचा- नेब्युलाइजर ऑक्सिजनचा पर्याय असू शकत नाही, पर्याय सुचवणाऱ्या डॉक्टरलाच मागावी लागली माफी!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा